मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार विक्री कंपनी आहे. स्वस्त आणि चांगल्या मायलेजसाठी लोक या कंपनीच्या वाहनांना पसंती देतात. दरम्यान मारुतीची एक नवीन एसयूव्ही नागरिकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. मारुती सुझुकीने सेकंड जनरेशन ब्रेझा 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या किंमतीत लाँच केली होती. लाँचच्या एक महिन्यानंतर या वाहनाच्या बुकिंगमध्ये प्रचंड वाढ दिसून आली आहे. ऑगस्ट महिन्यात एकूण 15 हजार 193 वाहनांच्या विक्रीसह हे वाहन देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बनली आहे.
कंपनीला नवीन 2022 मारुती ब्रेझा साठी आजपर्यंत 1 लाखांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत, अशी माहिती एमएसआयचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी एका मीडिया ग्रुपशी बोलताना दिली. कंपनी अलीकडेच मारुती ब्रेझाचे सीएनजी मॉडेल लॉन्च करण्याबाबत बोलली होती. ब्रेजाचे सीएनजी मॉडेल देखील लाँच होणार आहे.
५ ऑटोमॅटिक व्हेरिएंट
ही एसयूव्ही चार ट्रिम्स एलएक्सआय, व्हिएक्सआय, झेडएक्सआय, झेडएक्सआय + सह येते. या 1.5 लिटर के 15 सी पेट्रोल इंजिन आहे. इंजिन 103 बीएचपीचा पीक पॉवर आणि 137 एनएमचा टॉर्क निर्माण करते. त्याच्या मॅन्युअल वेरिएंटची किंमत 7.99 लाख ते 12.46 लाख रुपये आहे. यासह, यात व्हिएक्सआय, झेडएक्सआय, झेडएक्सआय ड्युअल-टोन, झेडएक्सआय+ आणि झेडएक्सआय+ ड्युअल-टोनचे पाच स्वयंचलित प्रकार आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे रु. 10.96 लाख, रु. 12.36 लाख, रु. 12.52 लाख, रु. 13.80 लाख आणि रु. 13.96 लाख आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत.
ब्रेजा सीएनजी लॉन्च होणार
कंपनी अलीकडेच मारुती ब्रेझाचे सीएनजी मॉडेल लॉन्च करण्याबाबत बोलली आहे. याशिवाय, मारुती सप्टेंबर २०२२ च्या अखेरीस मध्यम आकाराची नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्ही लाँच करणार आहे. टोयोटासोबत विकसित केलेले हे कंपनीचे पहिले हायब्रीड मॉडेल असेल. या वाहनाची रचना, वैशिष्ट्ये आणि पॉवरट्रेन टोयोटा अर्बन क्रूझर हायड्रर एसयूव्हीशी बर्याच प्रमाणात जुळतात. ग्रँड विटारा सुझुकीच्या ग्लोबल-सी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही एसयुव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह ऑफर केली जाईल.