Maruti Cars: देशात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. किंमत कमी व फायदे जास्त असं कमाल समीकरण देणाऱ्या या मारुती सुझुकीच्या मॉडेलची बाजारात प्रचंड चर्चा आहे. मारुतीच्या गाड्या भारतीय बाजारपेठेत लोकांच्या मनावर राज्य करतात. आज आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये मारुतीच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी असणारी Maruti Wagon R VXI आणि Maruti Alto K10 VXI कारवर असणाऱ्या एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन या दोन्ही कार स्वस्तात खरेदी करू शकता.

तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाइटवर काही जुन्या कार विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. तुम्ही देखील कमी बजेटमध्ये जुनी कार खरेदीचा विचार करत असाल तर या वेबसाइटवरून तुम्ही फक्त २ लाखात कार खरेदी करू शकतात. चला तर जाणून घेऊया कुठे मिळतेय हा जबरदस्त आॅफर.

(हे ही वाचा : 7-सीटर SUV-MPV शोधताय? पुढील वर्षांत लाँच होणार ‘या’ पाच दमदार कार, लूक अन् डिझाईनही कमाल )

‘येथे’ मिळताहेत बेस्ट आॅफर

विजयवाडा येथे Maruti Wagon R VX २०१८ चे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि त्याची नोंदणी देखील येथूनच आहे. कारसोबत एक वर्षाची वॉरंटी आणि तीन सेवा मोफत उपलब्ध आहेत. या कारची किंमत २ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारने आतापर्यंत एकूण ३३८७३ KM गाठले आहे.

(हे ही वाचा : Maruti Car: फक्त ६० हजारात खरेदी करा मारुतीची ‘ही’ जबरदस्त मायलेजवाली कार )

राजकोट येथे २०१६ चे मॉडेल Maruti Alto K10 VXI फक्त २ लाखात उपलब्ध आहे. या कारने एकूण १४,३३३८ KM गाठले आहे.

कैथलमध्ये २०१६ चे मॉडेल Maruti Alto K10 VXI २ लाखात उपलब्ध आहे. या कारने एकूण ९९२३५ KM धावले आहे. ही फक्त कैथलमध्ये नोंदणीकृत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुवाहाटी येथे Maruti Alto 800 LXI २ लाखात उपलब्ध आहे. कार गुवाहाटी येथे नोंदणीकृत आहे. या कारने २५२२०७ किमी अंतर गाठले आहे.