December Car Discount: कार उत्पादक कंपन्या वर्षभर त्यांच्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देत असतात. पण, सणासुदीच्या काळात आणि नंतर डिसेंबरमध्ये अनेक गाड्यांवर चांगल्या ऑफर्सही दिल्या जातात. डिसेंबर महिन्यात कंपन्या त्यांचा जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी चांगल्या ऑफर देतात. यातच देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी आपल्या काही निवडक कारवर बंपर ऑफर देत आहे. ही ऑफर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वैध असेल. चला तर पाहूयात मारुतीच्या कोणत्या कार तुम्हाला स्वस्तात घेण्याची संधी आहे.

मारुतीच्या ‘या’ कार स्वस्तात खरेदी करा

मारुती सुझुकी अल्टो K10

Alto K10 ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही प्रकारांमध्ये येते. यावर ५४,००० रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये ३५,००० रुपयांची रोख सवलत, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. CNG प्रकारावर २५,००० रुपयांपर्यंत रोख सूट आणि १५,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर

WagonR वर ५४,००० रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत, ज्यात ३०,००० रुपयांचा रोख बोनस, २०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे. तथापि, त्याच्या CNG आवृत्तीवर कॉर्पोरेट सूट दिली जात नाही.

(हे ही वाचा : मुंबईत दाखल झाली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, इतर कंपन्यांसमोर तगडं आव्हान; ४९९ रुपयांमध्ये करता येणार बुकींग, किंमत… )

मारुती सुझुकी सेलेरियो

सेलेरियोची विक्री खूपच कमी आहे. मारुती सुझुकी या हॅचबॅकवर ५९,००० रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. त्यावर ३५,००० रुपयांची रोख सूट, २०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट

स्विफ्टवर ५४,००० रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. यामध्ये ३०,००० रुपयांची रोख सूट, २०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांच्या कॉर्पोरेट डीलचा समावेश आहे. तथापि, त्याच्या एंट्री-लेव्हल LXi व्हेरियंटवर फक्त रु. १५,००० चा एक्सचेंज बोनस आहे.

मारुती सुझुकी डिझायर

Dezire ही एकमेव सेडान आहे, जी भारतातील (नोव्हेंबर २०२३) टॉप १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आहे. मारुती सुझुकी डिझायरवर २०,००० रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामध्ये १०,००० रुपयांची रोख सूट आणि १०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.