Cheapest CNG Cars : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. तर इलेक्ट्रिक कार अजूनही सर्वसामान्य लोकांच्या बजेटबाहेर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सध्या सीएनजी कार हा सर्वांत स्वस्त पर्याय आहे. अनेक भारतीय आज सीएनजी कार्सना पसंती देताना दिसतायत. त्यामुळे मार्केटमध्येही अनेक सीएनजी कार लाँच होताना दिसतायत. जर तुम्हीदेखील कुटुंबासाठी परवडणारी सीएनजी कार विकत घेण्याचा विचार करीत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही व्हॅल्यू फॉर मनी मॉडेल घेऊन आलो आहोत….

1) मारुती अल्टो के१० (सीएनजी) Maruti Alto K10 (CNG)

मायलेज : ३३.८५ किमी/किलो
किंमत : ५.९६ लाख रुपये

मारुती अल्टो K10 या कारमध्ये पेट्रोलबरोबर सीएनजी, असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या कारमध्ये १.० लि.चे पेट्रोल इंजिन आहे, त्यात सीएनजीचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. ही कार सीएनजी मोडमध्ये ३३.८५ किमी मायलेज देते. जर तुम्हाला दररोज हेवी ट्रॅफिकचा सामना करावा लागत असेल, तर ही कार तुमच्यासाठी बेस्ट कार आहे. कारण- हेवी ट्रॅफिकमध्येही ही कार सहज जाऊ शकते.

या कारच्या आत चांगला स्पेस देण्यात आला आहे. एवढेच नाही, तर त्याच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे ही कार चालवायला मजा येते. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह EBD आणि एअरबॅग्ज आहेत. त्यामुळे ही कार छोट्या कुटुंबासाठी योग्य कार असल्याचे मानले जाते. या कारमध्ये चार जण प्रवास करू शकतात; पण आसने आरामदायी नसल्यामुळे लांब अंतरावरील प्रवासात तुम्हाला थकवा जाणवू शकतो. या कारची एक्स-शो रूम किंमत ५.९६ लाख रुपयांपासून सुरू होते.

2) मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी (Maruti Suzuki Celerio CNG)

मायलेज : ३४.४३ किमी/किलो
किंमत : ५.९६ लाख रुपये

स्वस्त सीएनजी कारच्या यादीत पुढील कार मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी आहे. तुम्हाला या कारची डिझाइन आवडू शकते. तसेच कारच्या आत चांगली जागा असून, आरामात पाच जण बसू शकतात.

Celerio CNG ही प्रीमियम हॅचबॅक कार आहे. या कारच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे हेवी ट्रॅफिकमध्येही तुम्ही आरामात मार्ग काढू शकता. या कारमध्ये १.० लि. पेट्रोल इंजिन आहे. त्याचे इंजिन आणखी चांगली कामगिरी देते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये लॉक ब्रेकिंग सिस्टीमसह EBD आणि एअरबॅग्जची सुविधा आहे. ही कार CNG मोडवर ३४.४३ किमी/किलो मायलेज देते. Celerio CNG ची एक्स-शो रूम किंमत ६.३ लाख रुपयांपासून सुरू होते. जे चांगल्या सीएनजी कारच्या शोधात आहेत, त्यांना हे मॉडेल आवडेल.