मारुती सुझुकीने २०२२ मध्ये त्यांच्या दोन लोकप्रिय कारचे सीएनजी (CNG) प्रकार लॉंच केले असून त्यानंतर कंपनी त्यांच्या लोकप्रिय कारचे अपडेटेड आणि फेसलिफ्ट लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

मारुती सुझुकी कंपनीने ज्या गाड्या अपडेट करणार आहे त्यात हॅचबॅक ते एमपीव्ही आणि मध्यम आकाराच्या एसयूव्हीचा समावेश आहे, ज्या इंजिनपासून वैशिष्ट्ये आणि डिझाइनपर्यंत अपडेट केल्या जातील. जर तुम्हीही मारुती कंपनीची कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही येथे जाणून घेऊ शकता की कंपनी कोणत्या कारमध्ये काय अपडेट करणार आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या

मारुती एर्टिगा

मारुती एर्टिगा ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे, ज्याचे फेसलिफ्ट मॉडेल चाचणी दरम्यान दिसून आले आहे, कंपनी या कारमध्ये सध्याच्या इंजिनसह ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड AMT ट्रान्समिशन देऊ शकते. या मारुती एर्टिगाच्या आतील भागात मोठ्या ९.०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह पुन्हा डिझाइन केलेला डॅशबोर्ड देखील दिला जाऊ शकतो.

मारुती XL6

मारुती XL6 ही एक प्रीमियम MPV आहे. दरम्यान कंपनी ही कार बॉनेटच्या नवीन डिझाईनसह तसेच कारची समोरील बाजू आकर्षक बनवण्यासाठी नवीन डिझाइन क्रोम ग्रिलसह अंतर्गत आणि वैशिष्ट्यांसह अपडेट करणार आहे.

मारुती विटारा ब्रेझा

मारुती विटारा ब्रेझा (Maruti Vitara Brezza) ही कार त्यांच्या कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी मध्यम आकाराची SUV आहे, ज्याची फेसलिफ्ट आवृत्ती कंपनी लवकरच लॉंच करणार आहे. तर कंपनी या कारच्या डिझाईनपासून ते कारच्या वैशिष्ट्यांपर्यंत कंपनी मोठे बदल करणार आहे, या मारुती विटारा ब्रेझा फेसलिफ्टमध्ये कंपनीने केबिन आणि मागील फॅशियामध्ये मोठे बदल उघड केले आहेत. फीचर्स व्यतिरिक्त, कंपनी या कारच्या इंजिनमध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन देत बदल देखील करू शकते, ज्यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड AMT गिअरबॉक्स दिले जाऊ शकते.

मारुती बलेनो सीएनजी

या लोकप्रिय हॅचबॅकला नवीन आवृतीमध्ये सादर केल्यानंतर मारुती सुझुकी या कारचे CNG प्रकार लॉंच करण्याच्या तयारीत आहे. मारुती बलेनो १.२-क्षमतेच्या K२N इंजिनसह कंपनी-फिट सीएनजी किटसह लॉंच केली जाईल.

याशिवाय, कंपनी मारुती एस्प्रेसो, मारुती इग्निसच्या अपडेटवर काम करत आहे, जे नवीन इंजिन व्हेरिएंटसह देऊ शकतात, कंपनी एप्रिल २०२२ मध्ये या सर्व कार लॉंच करू शकते.