भारतात किफायतशीर कारप्रेमींची संख्या जरी मोठी असली तरी गेल्या काही वर्षांमध्ये देशात लक्झरी कारप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील लक्झरी कार्सच्या विक्रीबाबतची आकडेवारी पाहता लक्झरी कार उत्पादक कंपन्यांकडून देशात सातत्याने नवनव्या लक्झरी कार्स लाँच केल्या जात आहेत. भारतातील ग्राहकांकडून त्यास पसंतीदेखील मिळत आहे. देशात लक्झरी वाहनांची विक्रमी विक्री होत आहे. जर्मनीच्या लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझने नोंदवले आहे की, २०२३ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) भारतात विक्रमी ४,६९७ वाहनांची विक्री झाली आहे, जी १७ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात १ कोटींहून अधिक किमतीच्या वाहनांना चांगली मागणी आहे.

तीन कोटींहून अधिक किमतीची कार लाँच

मर्सिडीज-बेंझ इंडियाने त्याचे हायब्रिड AMG GT 63 SE परफॉर्मन्स मॉडेल सादर केले आहे. दिल्लीत या मॉडेलची सुरुवातीची शोरूम किंमत ३.३ कोटी रुपये आहे. महागड्या वाहनांच्या विक्रीला गती देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीची विक्री ३७ टक्क्यांनी वाढून १६,४९७ युनिट्स झाली. हा कंपनीचा सर्वाधिक विक्रीचा आकडा आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात हा आकडा १२,०७१ युनिट होता.

(हे ही वाचा : ८.२७ लाखाच्या मारुतीच्या ‘या’ एसयूव्हीनं Nexon, Creta चं वर्चस्व संपवलं, झाली तुफान विक्री )

मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संतोष अय्यर म्हणाले, “आमची वाढीची कहाणी तिमाही आणि आर्थिक वर्षात विक्रमी विक्रीसह सुरू आहे. २०२३ मध्येही आमची विक्री दुहेरी अंकांमध्ये वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या तिमाहीत ४००० कार विक्री

जर्मनीच्या लक्झरी कार कंपनी मर्सिडीज-बेंझने २०२३ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) भारतात ४,६९७ वाहनांची विक्रमी विक्री नोंदवली आहे, जी १७ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात कंपनीच्या एक कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वाहनांना चांगली मागणी आली आहे. कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ४,०२२ वाहनांची विक्री केली होती.