मारुती सुझुकीच्या 'या' गाड्यांवर मिळतेय ६० हजारांपर्यंतची मोठी सूट; पाहा यादी | Get Bumper festive offer on these Maruti Suzuki cars know what is discount price | Loksatta

मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६० हजारांपर्यंतची मोठी सूट; पाहा यादी

दिवाळीला नवी गाडी घेणार आहात? मारुती सुझुकीच्या या गाडयांवर मिळतोय मोठा डिस्काउंट लगेच जाणून घ्या.

मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६० हजारांपर्यंतची मोठी सूट; पाहा यादी
(Photo : Maruti Suzuki)

सध्या सर्व गोष्टींवर फेस्टिव सेलमध्ये मोठी सूट देण्यात येत आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मवर सर्वात मोठी सूट देण्यात येणार, याची जणू स्पर्धा सुरू आहे. गाड्या देखील या स्पर्धेमध्ये मागे नाहीत. अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर सूट देण्यात येत आहे. मारुती सुझुकीने देखील या फेस्टिव ऑफर्समध्ये सहभाग घेत काही गाड्यांवर २५ हजार ते ५९ हजार इतका मोठा डिस्काउंट जाहीर केला आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये पाच लोकप्रिय फ्लॅगशिप मॉडेल्सचा समावेश आहे.

मारुती सुझुकीच्या या गाडयांवर मिळतेय सूट

आणखी वाचा : ‘ग्रँड विटारा’नंतर टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

ऑल्टो के १०
ऑल्टो के १० देशातील सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. ही कार महिनाभरापूर्वी लाँच झाली आहे. आता कंपनी या कारवर २५ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. अल्टो के १० ची एक्स-शोरूम किंमत ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते.

ऑल्टो ८००
ऑल्टो ८०० या कारवर २९ हजारांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. यावर एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे.

वेगन आर
वेगन आर या फ्लॅगशिप कारची विक्री कमी झाली आहे, त्यामुळे विक्री पुन्हा वाढवण्यासाठी मारुती सुझुकीने या कारवर मोठी सवलत जाहीर केली आहे. या कारवर ४० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

Car Tips : कार नेहमी नव्यासारखी राहावी यासाठी वापरा ‘या’ टिप्स

सिलेरीयो
सिलेरीयो या कारवर ५९ हजारांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. यावर कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट डिस्काउंट, एक्सचेंज बोनस या ऑफर उपलब्ध आहेत.

एसप्रेसो
काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या एसप्रेसो कारवर ५९ हजारांची सूट जाहीर करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जीटी फोर्सने भारतीय बाजारात सादर केल्या ‘या’ दोन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त…

संबंधित बातम्या

२० सेकंदात बाईकचा स्पीड १६ kmph वरुन ११४ kmph वर गेला अन् दोघांचा मृत्यू झाला; धक्कादायक घटनाक्रम हेल्मेट कॅमेरात कैद
वाहतूक पोलीस तुमच्या गाडीची चावी आणि हवा काढू शकतात का? जाणून घ्या कायदा काय सांगतो
Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत!
Hyundai कंपनीने भारतातील लोकप्रिय गाडी केली बंद; कारण…
Traffic Rule: ट्रॅफिक चलान जारी केल्यानंतरही पैसे भरावे लागणार नाहीत! हा महत्त्वाचा नियम एकदा वाचाच!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
“रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, मग…”; सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक
उत्तर कोरिया: के-ड्रामा, अमेरिकी चित्रपट पाहिले म्हणून विद्यार्थ्यांना भरचौकात मृत्यूदंड; शिक्षा पाहणं स्थानिकांना केलं बंधनकारक कारण…
Maharashtra Karnataka Dispute: “कानडी जनता जर आक्रमक भूमिका घेत असेल, तर…,” एकनाथ खडसेंचं जाहीर आव्हान