भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक विदेशी कंपन्या भारतीय बाजारपेठेत दार ठोठावत आहेत. याच क्रमाने, तैवानची कंपनी गोगोरोनेही भारतात आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतात, ते Hero MotoCorp च्या सहकार्याने त्यांचे ई-स्कूटर्स विकणार आहे आणि ते ३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या योजनांचा खुलासा करणार आहे. अद्याप या स्कूटरच्या लॉन्चिंग बद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

गोगोरो इलेक्ट्रिक स्कूटर रेंज

कंपनी आपली ही इलेक्ट्रिक स्कूटर B2B या सेगमेंट मध्ये लॉन्च करेल.या स्कूटरसाठी कंपनीने व्हिवा हे नाव ट्रेडमार्क केले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ३ kW हब-माउंट मोटरसह सक्षम आहे. ही स्कूटर एका चार्ज मध्ये ८५ किमी पर्यंत धावू शकते. आणि त्याचबरोबर ही स्कूटर ३० किमी प्रतितास वेगाने चालवता येईल.

गोगोरोने आधी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी भारतात आपली ही नवीन स्कूटर बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानासह लाँच करू शकते. हे तंत्रज्ञान हिरो कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या विडा इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देखील असू शकते. गोगोरो भारतात आल्यानंतर स्मार्ट एनर्जी, अर्बन मोबिलिटी आणि डी-कार्बोनायझेशन यासारख्या क्षेत्रात काम करेल.

आणखी वाचा : अरेरे ग्राहकांच्या ‘या’ आवडत्या कारच्या किमतीत होणार वाढ; आत्ताच करा खरेदी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोगोरो इलेक्ट्रिक स्कूटर फीचर्स
गोरची ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक आकर्षक फीचरसह बाजारात उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने LED लाइटिंग, स्मार्टफोन-सक्षम LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल, दोन राइड मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि कीलेस इग्निशन इत्यादी गोष्टींचा समावेश असेल. गोगोरो आपली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, जी एक कमी-स्पीड स्कूटर असेल आणि या स्कूटरमध्ये कंपनी १.९ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक देणार आहे, ज्याला इलेक्ट्रिक हबसह जोडले जाईल.