सणासुदीच्या काळात ग्राहक खरेदीला अधिक पसंती देतात. या पार्श्वभूमीवर अनेक वाहन निर्मिती कंपन्या आपले नवीन वाहन आधुनिक फीचरसह लाँच करत आहेत. यात हिरो मोटोकॉर्पही मागे नाही. हिरो कंपनीनेही सणासुदीच्या काळात विक्री वाढण्यासाठी एक नवी बाईक लॉच केली आहे.

Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0 असे या बाईकचे नाव आहे. ही एक्सट्रिम सिरीजमधील बाईक आहे. बाईकच्या डिझाईनध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. मात्र तिच्यात काही यांत्रिक बदल झालेले नाही. पण बाईकमध्ये काही भन्नाट फीचर देण्यात आले आहे. जे या बाईकविषयी तुमची उत्सुक्ता वाढू शकते.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

बाईकमध्ये कनेक्ट १.० तंत्रज्ञान

हिरो कनेक्ट तंत्रज्ञानाने बाईकचे लोकेशन माहिती करता येते. यासाठी मोबाईल ब्ल्युटुथद्वारे बाईकला जोडण्याची सोय आहे. बाईकमध्ये हिरो कनेक्ट १.० तंत्रज्ञान लावण्यात आले आहे. याने तुम्हाला बाईकची लाईव्ह लोकेशन कळेल, तसेच बाईकने पूर्व निर्धारित गती मर्याद ओलांडल्यानंतर तुम्हाला सूचना मिळेल. बाईकमध्ये टॉपल अलर्ट देण्यात आला आहे जो बाईक पडल्यावर नोंदनीकृत मोबाईल नंबरवर आणि इमरजेन्सी नंबरवर मेसेज पाठवतो. नवे एडिशन रेड आणि काळ्या रंगांमध्ये लाँच करण्यात आले आहे.

(व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना जाणवू शकते नेटवर्कची समस्या, ‘हे’ आहे कारण)

बाईकमध्ये इतक्या सीसीचे इंजिन

बाईकमध्ये १६३ सीसीचे एयर कुल्ड बीएस ६ इंजिन देण्यात आले आहे. ज्यात एक्ससेन्स तंत्रज्ञान आणि एडव्हान्स्ड प्रोग्राम फ्यूल इंजेक्शनचा देखील समावेश आहे. इंजिन ६ हजार ५०० आरपीएमवर १५.२ पीएसची पावर देतो. बाईक ० ते ६० किलोमीटर प्रति तासाचा वेग केवळ ४.७ सेकंदात पकडे. या बाईकची एक्स शोरूम किंमत १ लाख २९ हजार ७३८ इतकी आहे. ही बाईक टीव्हीएस अपाचे, बजाज पल्सर एन १६०, यामाहा एफझेड एफआय या बाईक्सना आव्हान देईल.