Hero MotoCorp ही भारतातील लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीच्या उत्पादनांना भारतीय ग्राहकांंचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. आपल्या ग्राहकांसाठी हिरो कंपनीने नुकतीच Hero HF Deluxe या बाईकचे स्पेशल Canvas Black edition लॉन्च केले आहे. तसेच आता ही बाईक नेक्सस ब्लू नेक्सस ब्लू, कँडी ब्लेझिंग रेड, हेवी ग्रे-ब्लॅक आणि ब्लॅक-स्पोर्ट्स रेड अशा रंगांमध्ये पाहायला मिळणार आहे. रंगाचे हे पर्याय लवकरच ग्राहकांना निवडता येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरो एचएफ डिलक्सच्या नव्या कॅनव्हास एडिशनमध्ये All-black theme चा वापर करण्यात आला आहे. ब्लॅक-आउट इंजिन, अलॉय व्हील्स, मफलर, फ्रंट फोर्क आणि ग्रॅब रेल असे पार्ट्स मॅट ब्लॅक रंगाने रंगवले असल्याचे पाहायला मिळते. बाजूच्या पॅनल्सवरील 3D HF Deluxe emblem मुळे बाईकचा लूक आणखी क्लासी वाटत आहेत. यामध्ये सेल्फ आणि सेल्फ i3S व्हेरिएंट्समधील ट्यूबलेस टायर्ससारख्या अनेक स्टॅन्डर्ड फीचर्सचा समावेश आहे. बाईकसह एक USB चार्जर Accessory म्हणून दिला जाणार आहे.

आणखी वाचा – जपानला मागे टाकत भारत बनला Automobile क्षेत्रातला तिसऱ्या क्रमांकाचा देश; नितीन गडकरी म्हणाले, “२०२८ पर्यंत आपण..”

या स्पेशल एडिशनमध्ये 97.2cc एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, OHC, BS6 (OBD-II कंप्लायंट) PFI इंजिनसह ‘XSens टेक्नॉलॉजी’ आहे. यामुळे बाईकला 5.9kW आणि 8.05Nm क्षमता प्राप्त होते. हिरो एचएफ डिलक्सच्या कॅनव्हास एडिशनमध्ये 9.6-लिटरची इंधन टाकी असून त्याचे कर्ब व्हेट हे 112kg इतके आहे. यात 733 मिमी लांब सीट, २-स्टेप अ‍ॅडजस्टेबल सस्पेंशन आणि अलॉय व्हील आहेत. शिवाय ट्यूबलेस टायर, साइड स्टँड इंडिकेटर, क्रोम लेग गार्ड आणि टो गार्ड अशा सुविधा देखील आहेत.

आणखी वाचा – Honda Cars India च्या विक्रीदरात तब्बल ४३ टक्क्यांनी घट; मे २०२३ मध्ये झाली फक्त ४,६६० युनिट्सची विक्री, पाहा आकडेवारी

या बाईकसह पाच वर्षांची वॉरंटी आणि पाच Free Services दिल्या जाणार आहेत. व्हेरिएंटनुसार Hero HF Deluxe ची माहिती देण्यात आली आहे.

  • Hero HF Deluxe Drum Kick Cast – ६०,७६० रुपये
  • Hero HF Deluxe Drum Self Cast – ६६,४०८ रुपये
  • Hero HF Deluxe i3S Drum Self Cast – ६७,९०८ रुपये
  • Hero HF Deluxe Gold Black – ६७,२०८ रुपये

(किंमतीबाबतची माहिती दिल्लीच्या एक्स-शोरूमद्वारे मिळवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp today launched special canvas black edition of hero hf deluxe with four new colour variants know features price and other details yps
First published on: 05-06-2023 at 12:59 IST