Hero Electric Scooter on Down Payment: भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर्सचा बाजार दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. गगनाला भिडलेल्या इंधन दरांमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढतेय; परिणामी देशाच्या बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्यात. तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे, पण बजेटचं टेन्शन असेल तर काळजी करू नका, आज आम्ही तुम्हाला देशातील बाजारपेठेत स्वस्त दरात मिळत असलेल्या एका इलेक्ट्रिक स्कूटरविषयी माहिती देणार आहोत, जी सर्वसामान्यांनाही परवडणारी असेल…

देशातील हीरो ही कंपनी इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक विक्री करणारी कंपनी आहे. जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्कूटर घरी आणायची असेल तर Hero Electric कडे दमदार ईव्ही उपलब्ध आहेत. जर तुम्ही ती खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर १०,००० रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये तुम्ही हीरोची जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेऊ शकता. ही कोणती स्कूटर आहे आणि यावर किती EMI भरावा लागेल हे देखील सविस्तर जाणून घ्या…

हीरो मोटोकॉर्प तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये Vida V2 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करते. दिल्लीत Hero Vida V2 ची ऑन-रोड किंमत सुमारे ७९ हजार रुपये आहे. याबरोबरच तुमच्यासाठी आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे एकाच वेळी पूर्ण पेमेंट करण्याऐवजी, तुम्ही फक्त १०,००० रुपये डाउन पेमेंट करून फायनान्सदेखील करू शकता.

महिन्याला भरा केवळ ‘इतका’ EMI

जर तुम्ही दिल्ली-एनसीआरमध्ये ७९,००० रुपयांच्या ऑन-रोड किमतीवर १०,००० रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला बँकेकडून ६९,००० रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही बँकेकडून १० टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी कर्ज घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला ३६ महिन्यांसाठी सुमारे २३०० रुपये ईएमआय भरावा लागेल. जर तुम्ही कर्जावर Hero Vida V2 खरेदी केले तर तुम्हाला ११,००० रुपये EMI म्हणून द्यावे लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हीरो विडा व्ही२ च्या बेस लाईट मॉडेलमध्ये २.२ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. ते एका चार्जमध्ये ९४ किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. हीरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ६९ किमी प्रतितास आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर स्मार्ट फीचर्सने सुसज्ज असून ज्यामध्ये ७-इंचाचा TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, रिजन ब्रेकिंग आणि क्रूझ कंट्रोलसारख्या फीचर्सचा समावेश आहे. तुम्ही हीरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर मॅट नेक्सस ब्लू-ग्रे आणि ग्लॉसी स्पोर्ट्स रेडसारख्या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.