Honda कार्स भारतात लवकरच आपली मध्यम आकाराची एसयूव्ही लॉन्च करणार आहे. या एसयूव्हीचे नाव Elevate असे आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos या प्रतिस्पर्धी असलेल्या एसयूव्हीचे बुकिंग आधीपासूनच सुरू असताना जपानी ऑटो दिग्गज कंपनी असलेल्या होंडाच्या या नवीन मॉडेलबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आणि ती या एसयूव्हीच्या मायलेजशी संबंधित आहे.
होंडा Elevate पॉवरट्रेन
आधी समोर आलेल्या माहितीनुसार होंडा Elevate मध्ये एक विश्वसनीय असे १.५ लिटरचे i-VTEC DOHC पेट्रोल इंजिनचा वापर करेल. जे १२१ PS ची पॉवर आणि १४५ पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन एकतर ६-स्पीड MT किंवा ७-स्पीड CVT ऑटोमॅटिकसह जोडले जाऊ शकते. होंडा एलिव्हेटमध्ये कोणतीही हायब्रिड पॉवरट्रेन सादर करेल अशी अपेक्षा नाही. होंडा Elevate ही एसयूव्ही भारतात सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे. मात्र लॉन्चिंगची अधिकृत तारीख उघड झालेली नाही. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
हेही वाचा : Lectrix EV ने लॉन्च केल्या ‘या’ दोन जबरदस्त स्कूटर्स, मिळणार तब्बल ९३ फीचर्स
Honda Elevate: बुकिंग
होंडाने एलिव्हेटसाठी बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही ते Honda डीलरशिप आणि Honda द्वारे होम ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून बुक करू शकता. तुम्ही २१,००० रुपयांमध्ये बुकिंग करू शकता. ही एसयूव्ही चार पर्यायांमध्ये ऑफर केली जात आहे. त्यात SV, V, VX आणि ZX. MT हे पर्याय असणार आहेत. मात्र CVT पर्याय V, VX आणि ZX सह उपलब्ध असेल.
किंमत आणि स्पर्धा
होंडा Elevate ची किंमत ही १०.५० लाख ते १८ (एक्स-शोरूम) लाख रुपयांदरम्यान असू शकते. होंडा Elevate अतिशय मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. ही मध्यम आकाराची एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा, मारूती सुझुकी विटारा, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर आणि स्कोडा कुशाक, फॉक्सवॅगन Taigun आणि MG Astor या गाड्यांशी स्पर्धा करेल.
हेही वाचा : Lectrix EV ने लॉन्च केल्या ‘या’ दोन जबरदस्त स्कूटर्स, मिळणार तब्बल ९३ फीचर्स
होंडा Elevate MT दावा करण्यात आलेले मायलेज हे १५. ३१ kmpl आहे तर होंडा Elevate CVT साठी ते १६.९२ kmpl आहे. Honda Elevate चा १६० Kmph असेल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे .