Honda Elevate Launch: होंडा हा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ब्रॅण्ड आहे. नुकतंच या कंपनीची Honda Elevate SUV कार जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली आहे. ही आलिशान गाडी भारतीय बाजारपेठांमध्ये सणासुदीच्या काळात उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. होंडा एलिव्हेट खरेदी करण्यासाठीच्या बुकिंगला जुलै म्हणजेच पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे. त्यात अभिमानाची बाब म्हणजे ही SUV कार सर्वात आधी आपल्या देशामध्ये दिसणार आहे. Financial express ने दिलेल्या माहितीनुसार, Honda Elevate मिळवणारे भारत ही जागतिक स्तरावरील पहिली बाजारपेठ असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Honda Elevate: प्लॅटफॉर्म आणि डिझाइन

नव्या होंडा एलिव्हेटमध्ये 5th जनरेशन होंडा सिटीमध्ये असलेल्या प्लॅटफॉर्म डिझाइनकडून प्रेरणा घेत प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. या गाडीमध्ये अपराइट ग्रील, स्लीक एलईडी हेडलाइट्स, स्क्वेअर व्हील कमानी आणि हाय वेस्टलाइन आहे. यामुळे एसयूव्हीला बुच लुक मिळतो. जागतिक बाजारपेठेमधील HR-V आणि CR-V कडून कारच्या एकूण डिझाइनची प्रेरणा घेतली आहे. ही कार कंपनीच्या SUV Cars Segment मधील अन्य Urban SUVs प्रमाणे Honda Elevate ची निर्मिती करण्यात आली असल्याचे होंडा कंपनीने सांगितले आहे.

Honda Elevate: इंजिनाची वैशिष्ट्ये

होंडा सिटीप्रमाणे होंडा एलिव्हेटमध्येही 1.5 लीटर नॅचरली-अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. ज्याच्यामध्ये 119bhp आणि 145Nm टॉर्कची क्षमता असणार आहे. सध्या कारमध्ये फक्त नॅचरली-अ‍ॅस्पिरेटेड इंजिन बसवण्यात आले आहे. पण येत्या काही दिवसांमध्ये त्यामध्ये 1.5 लीटर हायब्रिड इंजिन असणार आहे. या हायब्रीड इंजिनमुळे 96bhp आणि 127Nm टॉर्क मिळेल. हे इंजिन e-CVT शी जोडलेले असणार आहे.

Honda Elevate: फीचर्स आणि सेफ्टी

Honda Elevate मध्ये वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, प्रीमियम स्पीकर्स, वायरलेस चार्जिंग, 7-इंचाचा TFT इन्स्टूमेंट डिस्प्ले तसेच 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम असा काही खास फीचर्स असणार आहेत. यामध्ये सनरुफ देखील उपलब्ध असणार आहे. पण क्रेटा कारच्या तुलनेमध्ये त्याचा आकार काहीसा लहान आहे. या कारमध्ये ADAS जोडलेले आहे. ज्याला होंडा कंपनीने ‘Honda Sense’ असे नाव दिले आहे.

यात लेन-कीपिंग असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, रोड डिपार्चर मिटिगेशन सिस्टीम, कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम, लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन आणि ऑटो हाय-बीम असिस्ट अशा गोष्टी आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये ADASसह एअरबॅग्ज, रिव्हर्सिंग कॅमेरा, इमर्जन्सी स्टॉप लाइट्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर यांसारख्या काही अत्याधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Kia Seltos ने रचला मोठा विक्रम; Kia कंपनीने फक्त चार वर्षांमध्ये केली ५ लाख सेल्टोस कार्सची विक्री; बनली भारतातील टॉपची SUV कार

Honda Elevate: किंमत

ज्या श्रेणीमध्ये Honda Elevate आहे, त्या श्रेणीत सध्या Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Hyryder अशा लोकप्रिय कार्सचा समावेश आहे. त्यामुळे बाजारात प्रत्यक्षपणे उतरल्यानंतर होंडाच्या नव्या कारला आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या कारची किंमत 10 ते 17 लाख रुपये (एक्स-शोरूम दरम्यान) असू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda elevate makes global debut on 6 june 2023 bookings open from july 2023 know styling features engine price and many more yps
First published on: 06-06-2023 at 18:26 IST