Honda officially discontinues 4th-gen City, WR-V and Jazz: जपानची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने एकाच वेळी आपल्या तीन कार Honda Jazz, Honda WR-V आणि Honda City 4th Generation बंद केल्या आहेत. यामध्ये, Honda Jazz ही प्रीमियम हॅचबॅक होती, Honda WRV ही सब-4 मीटर क्रॉसओव्हर होती आणि सिटी ही सेडान कार होती. कंपनीच्या या निर्णयानंतर, Honda Amaze आणि Honda City 2023 या दोनच गाड्या भारतात Honda च्या पोर्टफोलिओमध्ये उरल्या आहेत.
हे तिन्ही कंपनीचे लोकप्रिय मॉडेल आहेत जे बऱ्याच काळापासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होते. तिन्ही कार कंपनीच्या जुन्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत आणि त्यांचे नवीनतम मॉडेल इतर बाजारपेठांमध्ये विकले जात आहेत. नवीन WR-V आणि Jazz आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत, तर भारतात जुने मॉडेल पाचव्या पिढीतील सिटी सेडान असूनही विकले जात होते.
(हे ही वाचा : Honda, Bajaj विसरा, विक्रीच्या बाबतीत ‘या’ भारतीय बाईकची सगळ्या टू-व्हीलर्सवर मात, मायलेज ८३ kmpl )
‘या’ कार बंद करण्याचे कारण काय?
भारतीय बाजारपेठेत ही तीन वाहने बंद करण्याचे कारण म्हणजे त्यांची विक्री. वास्तविक बराच काळ या तिघांच्या गाड्या अत्यंत मर्यादित प्रमाणात खरेदी केल्या जात होत्या. ही वाहने ग्राहकांना कंपनीच्या अपेक्षेइतकी पसंती मिळत नव्हती. अशा स्थितीत होंडा लवकरच ही वाहने बंद करू शकते, असा बराच काळ विश्वास होता.
याचे दुसरे कारण म्हणजे एप्रिलपासून लागू करण्यात आलेले रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई) नियम, ज्यासाठी कंपन्यांना त्यांच्या कार अपग्रेड करण्यास भाग पाडले गेले. RDE नियमांनुसार, कार कंपन्यांना त्यांच्या कारमध्ये एक डिव्हाइस स्थापित करावे लागेल, जे कारमधून उत्सर्जनावर सतत लक्ष ठेवते. अशा परिस्थितीत कंपनीने खर्च करून ही वाहने अपडेट करणे हा शहाणपणाचा निर्णय नाही.
आगामी नवीन मध्यम आकाराची SUV
होंडा भारतीय बाजारपेठेसाठी नवीन मॉडेल विकसित करण्यात व्यस्त आहे. ही कंपनीची मध्यम आकाराची एसयूव्ही असेल, जी Hyundai Creta ला आव्हान देणार आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही यापूर्वीही अनेक वेळा स्पॉट झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस ते बाजारात येण्याची शक्यता आहे. त्याची किंमत सुमारे ११ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
