How to get Online Driving License: विना परवाना वाहन चालवल्यास मामा, दादा करून सुटण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. अशावेळी तुम्ही पकडले गेलात तर ५००० रुपयाला मोठा फटका बसू शकतो. आपल्याला जर गाडी येत असेल किंवा अगदी आपण शिकत असाल तर कायमस्वरूपी परवाना काढण्याआधी आपण एक शिकाऊ परवाना काढून घेऊ शकता. कायमस्वरुपी लायसन्स साठी आपल्यालाआरटीओ केंद्रात जाऊन परीक्षा देणे आवश्यक असते. मात्र महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार आपण लर्निंग लायसन्स हे घरबसल्या केवळ ऑनलाईन परीक्षा देऊन सुद्धा मिळवू शकता.

आपल्या सोयीनुसार या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आरटीओ एक्साम असे खास ऍप सुद्धा तयार करण्यात आले आहे. याचा वापर कसा करावं आ व ऑनलाईन लर्निंग लायसन्स कसे बनवून घ्यावे याची माहिती आपण जाणून घेऊयात..

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
house buyer interest marathi news
घराचा ताबा विलंबाने मिळाल्यास खरेदीदार व्याजासाठी पात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खरेदीदारांना दिलासा

ऑनलाईन लर्निंग लायसन्ससाठी नोंदणी कशी कराल?

  • रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या वेबसाइट (https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do) ला भेट द्या.
  • ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये आपले राज्य निवड
  • या नंतर आपल्याला यादीत उपलब्ध पर्यायांपैकी लर्निंग लायसन्स बनवून घेण्याचा पर्याय निवडायचा आहे
  • घरून ऑनलाईन टेस्ट देण्याचा पर्याय निवडा
  • भारत सरकार द्वारे जारी केलेल्या विना ड्रायव्हिंग लायसन्स अशा बॉक्स वर क्लिक करून सबमिट करा
  • आधार कार्ड व्हेरिफाय करण्याच्या पर्यायावर जाऊन तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक व आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर सबमिट करा.
  • इथे आपल्याला Generate OTP असा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
  • ओटीपी टाकल्यावर सर्व डिटेल्स नीट काळजीपूर्वक भरून नियम अटी स्विकारण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तसेच इथे ऑथेंटिकेशन बटणावर सुद्धा क्लिक करा.
  • लायसन्स साठी फी भरण्याचा पर्याय निवडा

परीक्षा कशी द्याल?

  • आता तुम्हाला टेस्ट देण्यापूर्वी १० मिनिटांचा एक ड्रायव्हिंग बाबत सूचना देणारा व्हिडीओ पाहावा लागेल, हा व्हिडीओ फॉरवर्ड न करता पहा अन्यथा गृहीत न धरता पुन्हा बघावा लागतो.
  • व्हिडीओ संपल्यावर तुमच्या नोंदणीकृत नंबरवर टेस्ट साठी ओटीपी आणि पासवर्ड पाठवला जाईल.
  • आता तुम्हाला दिलेला फॉर्म भरून मग आपल्या डिव्हाईसचा फ्रंट कॅमेरा सुरु करायचा आहे.
  • यामध्ये तुम्हाला निदान १० पैकी ६ उत्तरे बरोबर द्यायची आहेत.
  • तुम्ही बरोबर उत्तरे दिल्यावर तुम्हाला लायसन्सची ऑनलाईन प्रत पाठवली जाईल.
  • तुम्ही उत्तरे बरोबर दिली नाही तर ५० रुपये फी भरून पुन्हा टेस्ट द्यावी लागेल.

दरम्यान, चालकाला शिकाऊ लायसन्सची मुदत संपल्यावरच कायमस्वरूपी लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओत यावे लागेल. शिकाऊ परवान्याची मुदत सहा महिने इतकी असते.