How to remove fog from your car windshield: सहसा पावसाळ्यात, जेव्हा लोक कार चालवतात तेव्हा खिडक्या बंद ठेवतात, तेव्हा विंडशील्डच्या आतील बाजूस धुके जमा होते. या समस्येमुळे काचेची दृश्यमानता (Visibility) कमी होते आणि हे खूप धोकादायक असू शकते.

खरे तर, आर्द्रता वाढल्यामुळे धुके तयार होणे खूप सामान्य आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत की, जिच्या मदतीने आर्द्रता वाढली तरी कारच्या काचांवर धुके तयार होणार नाही.

Riding a bike in cold
थंडीच्या दिवसात बाईक रायडिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टींची घ्या विशेष काळजी
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा…
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
What are the benefits of bathing with camphor find out
पाण्यात कापूर टाकून अंघोळ केल्याने काय होतो फायदा? जाणून घ्या
car maintenance tips
पावसाळा संपल्यानंतर अशी घ्या कारची विशेष काळजी; ‘या’ पाच महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या
Coriander Juice benefits
Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…
The deer risked its own life to save the cub
‘आई, तू परत ये ना…’ पाण्यात पोहणाऱ्या मगरीपासून पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी आईने केलं असं काही… VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
ai antibiotics loksatta article
कुतूहल : नव्या प्रतिजैविकांच्या शोधात ‘एआय’

पावसाळ्यात विंडशील्डवर धुके तयार (fog) होण्याचे मुख्य कारण म्हणजे कारच्या आत व बाहेरील तापमान आणि आर्द्रतेतील फरक. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कारच्या बाहेर हवेत जास्त आर्द्रता असते; ज्यामुळे आर्द्रतेची पातळी वाढते आणि तापमान कमी होते. त्यामुळे गाडीचे विंडशिल्ड बाहेरून थंड होऊ लागते.

हेही वाचा… अखेर प्रतिक्षा संपली! तरुणांची आवडती बाईक ‘या’ दिवशी होणार लाँच; फीचर्स अन् डिझाईन पाहून प्रेमात पडाल

यादरम्यान कारमध्ये बसलेल्या लोकांच्या शरीरातील उष्णता आणि इंजिनाच्या उष्णतेमुळे कारमधील हवा गरम राहते. जेव्हा ही गरम हवा विंडशिल्डच्या थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते तेव्हा धुके तयार होते. त्याचप्रमाणे जर कारच्या बाहेरचे तापमान खूप कमी असेल आणि आत गरम असेल, तरीही आरशांवर धुके तयार होईल; जे हिवाळ्याच्या हंगामात होते.

विंडशिल्ड धुके टाळण्यासाठी किंवा कमी करण्याचे मार्ग (How to remove fog from your car windshield)

विंडशिल्ड धुके टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. सर्वप्रथम आपल्या कारची व्हेंटिलेशन सिस्टीम योग्यरीत्या कार्य करीत असल्याची खात्री करा. कंडेन्सेशन दूर करण्यासाठी डीफॉगर चालू करा, जे विंडशिल्डवर गरम हवा सोडेल.

हेही वाचा… Tata Punch Discount: टाटा पंचवर आता मोठी सवलत! ऑगस्टच्या महिन्यात मिळेल ‘इतक्या’ हजारांची सूट

त्याशिवाय एअर कंडिशनिंग चालू केल्याने केबिनमधील तापमान कमी होण्यास मदत होईल. अशा परिस्थितीत केबिन आणि कारबाहेरील तापमानात फारसा फरक नसला तरीही विंडशिल्डवर धुके तयार होणार नाही. इतकेच नाही, तर गाडीच्या खिडक्या थोडा वेळ उघडल्या, तर धुके कधीही तयार होणार नाही.

हेही वाचा… Electric Car घ्यायचीय? थोडं थांबा, भारतात लाँच होतायत ५ नवीन इलेक्ट्रिक कार, मिळणार Advance फिचर्स अन् बरंच काही!

Photo Credit- Freepik