आपण कोणतीही गाडी खरेदी करत असताना त्याची किंमत, त्यातील मायलेज तसेच फीचर्स आणि अन्य गोष्टींची चौकशी करूनच खरेदी करत असतो. तसेच कार खरेदी केल्यानंतर देखील आपण त्याची योग्य पद्धतीने काळजी घेत असतो. कारमध्ये इंजिन, बॅटरी हे तसेच महत्वाचे भाग असतात. आज आपण कारच्या बॅटरीचे आयुष्य जास्तीत जास्त काळ कसे टिकेल यासंदर्भात जाणून घेणार आहोत.

सरासरी प्रत्येक कारच्या बॅटरीचे आयुष्य हे तीन ते पाच वर्षे इतके असते. जे हवामानाची स्थिती आणि कारचा वापर यासह अन्य गोष्टींवर अवलंबून असते. जर का काही सोप्या टिप्सचे पालन केले तर बॅटरी लवकर खराब होणे टाळता येऊ शकते. जर का तुम्हाला एक किंवा दोन वर्षांमध्ये बॅटरी ब्ल्डने टाळायचे असल्यास काही सोप्या स्टेप्स आहेत. त्या जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त hindustantimes ने दिले आहे.

हेही वाचा : Car Finance Plan: दरमहिना फक्त १३ हजार द्या अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ८ लाखांची ‘ही’ कार

कार जास्त काळ बंद ठेवू नये.

जर का तुमची कार खूप दिवसांपासून बंद असेल म्हणजेच ती चालवली गेली नसेल तर त्यामुळे बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या कारची बॅटरी नीटपणे रिचार्ज होऊ शकणार नाही. कारचा वापर नियमितपणे केल्यास इंजिन गरम होते. यामुळे बॅटरी रिचार्ज होण्यास पुरेसा वेळ मिळतो. तुमची कार जर का दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालू केली नाही तर कार सुरू करताना बॅटरीकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ३० मिनिटांसाठी तुमची कार ड्राइव्हसाठी बाहेर काढावी.

बॅटरी नियमितपणे स्वच्छ ठेवावी.

कारच्या बॅटरीवर काजळी, घाण किंवा ओलसरपणा यांसारखे नैसर्गिक घटक नकारात्मक परिणाम करतात. यामुळे बटरीच्या केसमधून लीकेज होऊ शकते. ज्यामुळे बॅटरी फ्लॅट होऊ शकते. म्हणून बॅटरीच्या पृष्ठभागावरील काजळी काढण्यासाठी स्पंज आणि कोरड्या कापडाने महिन्यातून एकदा तरी स्वच करणे आवश्यक आहे. ओलसर हवामानात बॅटरीच्या टर्मिनल्स आणि लीड क्लॅम्प्सवर गंज येऊ शकतो. त्यामुळे ते स्वच ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price On 23 July: ‘या’ शहरात पेट्रोल डिझेल स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील आजच्या किंमती

विनाकारण इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नयेत.

तुमच्या कारचे हेडलाइट्स किंवा इंटेरिअर लाइट चालू ठेवल्याने आणि इंजिन शिवाय इंफोटेनमेंट सिस्टीम चालवण्यासाठी इग्निशन चालू केल्याने बॅटरी संपू शकते. यामध्ये इंजिन बंद असताना कारचा अल्टरनेटर बंद होतो आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कारच्या बॅटरीमधून उर्जा काढून टाकतात. म्हणून, कारमधून उतरून कार बंद करताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालू राहणार याची खात्री करावी. कारमधून उतरताना सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा. तसेच, तुम्ही तुमची कार सोडता तेव्हा लॉक करा कारण ती अनलॉक ठेवल्याने ऑनबोर्ड संगणक प्रणाली चालू राहते, परिणामी बॅटरी संपते.