Car Discounts for May 2025:  कार खरेदी करण्यासाठी ही सध्याची वेळ खूपच उत्तम आहे. एक प्रसिद्ध कार निर्माता कंपनी आपल्या कार्सवर बंपर ऑफर्स देत आहे. तुम्हाला लाखो रुपयांच्या सूटसह कार खरेदी करता येईल. मे महिन्यात एका कार कंपनीने तिच्या कारवर भरघोस सूट देण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊन चांगली बचत करू शकता. कोणत्या कार कंपनीने ही विशेष ऑफर आणली आहे जाणून घेऊया.

‘या’ कार्सवर तगडा डिस्काउंट जाहीर

जर तुम्ही मे २०२५ मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Renault च्या जबरदस्त डिस्काउंट ऑफरचा लाभ घेऊ शकता. हो, कारण Renault India ने Triber, Kiger आणि Kwid सारख्या लोकप्रिय मॉडेल्सवर एक लाखांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. ही सूट मर्यादित काळासाठी लागू आहे. आज आम्ही तुम्हाला Kwid वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत.

Renault Kwid MY24

Renault Kwid च्या MY24 मॉडेलवर एक लाखांची पूर्ण सूट मिळत आहे, ज्यामध्ये ५०,००० ची रोख सूट समाविष्ट आहे. याशिवाय, कंपनी या मॉडेलवर ४०,००० रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटदेखील देत आहे.

Renault Kwid MY25

Renault Kwid MY25 वरील सवलतीच्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर कंपनी २०२५ मॉडेलवर फक्त ३५,००० रुपयांची सूट देत आहे, ज्यामध्ये १०,००० रुपयांची रोख सूट समाविष्ट आहे. त्याच वेळी कंपनी या मॉडेलवर २५,००० रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट देत आहे.

२०२४ च्या रेनॉल्ट ट्रायबर (Triber MY24) वर १ लाख रुपयांची सूट

रेनॉल्ट ट्रायबर (ट्रायबर MY24) च्या २०२४ मॉडेल वर्षावर १ लाख रुपयांची सूट दिली जात आहे. कंपनी त्यांच्या २०२४ मॉडेल (MY24) वर ५०,००० रुपयांची सूट देत आहे. त्याच वेळी, ५०,००० रुपयांचा एक्सचेंज आणि कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे. एकूणच, कंपनी या मॉडेलवर १,००,००० रुपयांची सूट देत आहे.

ग्रामीण योजना आणि लॉयल्टी बोनस

Renault ने शेतकरी आणि पंचायत अधिकाऱ्यांसाठी ४,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त ग्रामीण सूटदेखील देऊ केली आहे. याशिवाय, विद्यमान Renault ग्राहकांना लॉयल्टी आणि एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत अतिरिक्त फायदे मिळू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑफर किती काळ वैध आहे?

या सर्व सवलती ३१ मे २०२५ पर्यंत वैध आहेत. परंतु, लक्षात ठेवा की ऑफर व्हेरिएंट, शहर आणि डीलरच्या स्टॉकवरदेखील अवलंबून असते, म्हणून खरेदी करण्यापूर्वी स्थानिक डीलरशी खात्री करा. जर तुम्ही मर्यादित बजेटमध्ये विश्वासार्ह आणि वैशिष्ट्यपूर्ण कार शोधत असाल, तर Renault Kwid ची ही डील तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.