भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही अशा विविध सेगमेंटमध्ये मोठ्या संख्येत कारचे पर्याय ग्राहकांसमोर आहेत. एसयूव्ही सेगमेंटच्या कारची मागणी अलीकडे वाढली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून सेडान सेगमेंटच्या कार भारतीयांची पहिली पसंती राहिल्यात. अजूनही स्टायलिश डिझाइनसह जास्त स्पेसमुळे अनेकजण सेडान कारलाच प्राधान्य देतात. आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेत कोणत्या सेडान कारची मागणी वाढली आहे, याबद्दल माहिती देत आहोत.

देशातील सेडान कार बाजारात Hyundai Aura सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून उदयास आली आहे. जर आपण मार्च २०२४ च्या आकडेवारीबद्दल बोललो तर या कारच्या विक्रीच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ दिसून येते. ताज्या डेटावरून असे दिसून आले आहे की, Hyundai ने Aura च्या ४,८८३ युनिट्सची विक्री केली, जी मागील वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या ३,७७४ युनिट्सच्या तुलनेत २९ टक्क्यांची लक्षणीय वाढ आहे.

विक्रीतील या उडीमुळे मार्च २०२४ मध्ये भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडानच्या यादीत ऑरा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या परिस्थितीत ती फक्त मारुती सुझुकी डिझायरच्या मागे आहे. या कारची किंमत ६.४९ लाख रुपयापासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटसाठी, ग्राहकांना ९.०५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत खर्च करावा लागतो.

(हे ही वाचा : Raider आणि Pulsar ची उडाली झोप, नवीन १२५cc बाईकने देशात दाखल होताच बाजारात उडविली खळबळ)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कार पेट्रोल आणि सीएनजी इंजिन दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. दोन्ही पर्यायांमध्ये १.२-लिटर इंजिन आहे. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, Hyundai ने Aura साठी डिझेल इंजिन व्हेरियंट ऑफर न करणे निवडले आहे. ऑरावरील ट्रान्समिशन पर्यायांमध्ये पेट्रोल इंजिनसाठी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सेसचा समावेश आहे, तर सीएनजी इंजिनची निवड करणाऱ्यांना फक्त मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. इंधन कार्यक्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पेट्रोल व्हेरियंट्स १७ किमी प्रति लिटर मायलेज देतात. तर CNG प्रकाराला २२ किमी/किलो मायलेज मिळते.

या कारच्या फीचर्स बद्दल बोलायचे तर, यात वायरलेस फोन चार्जर, अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हिटीसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एअर कंडिशनर, क्रूझ कंट्रोल यासारख्या फीचर्ससह ४०२ एल बूट स्पेस देखील आहे.