scorecardresearch

Premium

Kia Seltos ने रचला मोठा विक्रम; Kia कंपनीने फक्त चार वर्षांमध्ये केली ५ लाख सेल्टोस कार्सची विक्री; बनली भारतातील टॉपची SUV कार

सध्या ही ऑटोमोबाईल कंपनी Kia Seltos च्या facelifted verison वर काम करत आहे. लवकरच हे मॉडेल भारतामध्ये लॉन्च केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Kia Seltos
Kia Seltos (फोटो सौजन्य – Financial express)

Kia India ही आपल्या देशातील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे. Kia Seltos ही कंपनीची सर्वात लोकप्रिय SUV कार आहे. विक्रीच्या आकड्यांवरुन ग्राहकांची या कारला पसंती मिळत असल्याचे लक्षात येते. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये ही चारचाकी गाडी भारतात लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीसाठी ही कार हिट प्रोडक्ट ठरले. पदार्पण केल्याच्या चार वर्षांमध्येच सेल्टोसच्या ५ लाख कार युनिट्सची विक्री करत नवा विक्रम रचल्याची घोषणा कंपनीद्वारे करण्यात आली. Kia कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये या मध्यम आकाराच्या स्पोर्ट युटिलिटी वाहनाचे तब्बल ५५ टक्के योगदान आहे.

या विक्रमाबाबत Kia India चे प्रमुख कार्यकारी अधिकारी ताई-जिन पार्क (Tae-jin Park) यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “सेल्टोसला मिळलेले यश हे आमच्यासाठी एका उत्सवाप्रमाणे आनंद देणारे आहे. हे उत्तम गुणवत्तेव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीवर समाधान न मानण्याचे प्रतीक आहे. जेव्हा आवड आणि नाविण्यपूर्ण तंत्र या गोष्टी एकत्र येतात, तेव्हा कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येते. सेल्टोसच्या रुपाने आम्ही ग्राहकांसाठी एक खास ड्रायव्हिंग साथीदार तयार केला आहे. या कारने ५,००,००० पेक्षा जास्त ग्राहकांना खुश करत त्यांचा विश्वास संपादन केला आहे.”

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितलं कारण, म्हणाले…

ते पुढे म्हणाले, “सेल्टोसच्या अतुलनीय प्रवासाचे साक्षीदार असलेल्या प्रत्येकासाठी हा भावनिक क्षण आहे. २०२३ च्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये तब्बल २७,१५९ Kia Seltos युनिट्सची विक्री झाली आहे. कंपनीच्या SUV Segment मध्ये नवनवीन मॉडेल्सवर काम सुरु असतानाही दर महिन्याला सरासरी ९,००० सेल्टोसची विक्री होत आहे.”

आणखी वाचा – Honda Elevate SUV आज भारतात होणार लॉन्च; स्टायलिंग फिचर्सची माहिती आली समोर, किंमत मात्र गुलदस्त्यात..

Kia Seltos facelift launch

Financial express ने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये लवकरच Kia Seltos चे facelift व्हर्जन लॉन्च होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. या अपडेटेड मॉडेलमध्ये स्टायलिंगमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. Revised front fascia , ADAS सह अनेक नव्या फीचर्सचा यामध्ये समावेश असू शकतो. या मॉडेलचे डिझाइन सध्याच्या सेल्टोससारखेच असेल, फक्त त्यामध्ये १.४ लीटर युनिटऐवजी अधिक शक्तिशाली १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन बसवले जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 14:31 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×