भारतात पुढील वर्षी जानेवारी महिन्यात २०२३ मध्ये ऑटो एक्स्पो आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात देशातील सर्वात जलद वाढ होणारी एकमेव कार निर्माती किआ इंडिया आपली सर्वाधिक विक्री होणारी किआ सेल्टॉस कार भारतात नवीन अवतारात सादर करणार होती. परंतु, कंपनीने भारतीय ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. किआ इंडियाने पुष्टी केली आहे की, ते ऑटो एक्स्पो मध्ये ‘किआ सेल्टॉस फेसलिफ्ट’ मॉडेल सादर करणार नाही. कंपनी २०२३ च्या उत्तरार्धात एसयूव्हीची आगामी फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करू शकते. याशिवाय Kia EV6 क्रॉसओवर देखील लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. विशेष बाब म्हणजे, सेल्टोस कार किआ कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

कशी असेल ही कार ?

किआ सेल्टॉस फेसलिफ्टही कार आता अपडेट करण्यात आली आहे. कारला नवीन प्रकारचे इंटीरियर आणि एक्सटीरियरसह स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. तसेच या कारला एलईडी हेडलॅम्पसह नवीन एलईडी डीआरएल देखील दिसले. एकूणच, कारचा बंपर देखील अगदी नवीन असणार आहे.

आणखी वाचा : होंडा आणतेय नवीन दमदार कार; मारुतीच्या ब्रेझाशी होणार जोरदार टक्कर, पाहा कधी होणार सादर

किआ सेल्टॉस फेसलिफ्ट मॉडेलचा साइड फेस पाहिला तर त्यात फारसे अपडेट्स आलेले नाहीत. पण नवीन अलॉय व्हील्समुळे ही कार आणखीनच दमदार दिसते. तसेच १०.२५-इंचाचा वक्र स्क्रीन डिस्प्ले आढळू शकतो.

एसी कंट्रोलसाठी नवीन स्विच देखील दिले जातील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नवीन कार अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम म्हणजेच एडीएएसने सुसज्ज असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किआ सेल्टॉस मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह १.५ लिटर पेट्रोल, १.५ लिटर डिझेल, १.४ लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये येते.