Kia Syros Variants: कियाची नवीन एसयूव्ही किया सायरस (SUV Kia Syros) कार लवकरच भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च होणार आहे. या कारचे असे दोन वेगळे व्हेरियंट आहेत, जे ग्राहक सर्वाधिक पसंत करत आहेत. पण, किया सायरसचे नेमके कोणते दोन व्हेरियंट आहेत, ज्यांना ग्राहकांकडून प्रचंड मागणी आहे? जाणून घेऊ…

डीलर्सचे म्हणणे आहे की, या कारमधील रियर सीटर व्हेंटिलेशन फीचर सर्वात खास आहे. यामुळे अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीच या कारला १० हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहे. किया सायरस कंपनीची ही दुसरी कॉम्पॅक्ट SUV कार आहे, जी या महिन्यात ऑटो एक्सपो २०२५ मध्येदेखील शोकेस करण्यात आली होती.

किया सायरसचे जबरदस्त लोकप्रिय व्हेरिएंट (Kia Syros Features )

या कारच्या HTX+ आणि HTX+ (O) व्हेरिएंटना जास्तीत जास्त बुकिंग मिळाले आहे. या कारच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास या व्हेरिएंटमध्ये ADAS, अॅडिशनल पार्किंग सेन्सर, ३६० डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर फीचर्स देण्यात आले आहेत.

याशिवाय या कारमध्ये ड्युअल-पेन पॅनोरमिक सनरूफ, ड्युअल-टोन इंटीरियर, १७ इंच अलॉय व्हील, ॲम्बियंट लाइटिंग, ८ स्पीड साउंड सिस्टम आणि ड्युअल १२.३ इंच स्क्रीन आहे. कंपनीने HTK+ व्हेरिएंटमध्ये ड्युअल-पेन पॅनोरामिक सनरूफ फीचर्सदेखील दिले आहे, यासह यात क्रूझ कंट्रोल, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, ड्राइव्ह आणि ट्रॅक्शन मोड्स मिळतील.

इंजिनविषयी माहिती

किया सायरसमध्ये १.० लिटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल इंजिन आहे, डीलर्सचे म्हणणे आहे की, सुमारे ६० टक्के लोक टर्बो पेट्रोल व्हेरिएंटचे बुकिंग करत आहेत. यातील बहुतांश ग्राहक ड्युअल क्लच ट्रान्समिशन ऑप्शनची बुकिंगही करत आहेत.

किया सायरस बुकिंग
पुढील महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत या कारची टेस्ट ड्राइव्ह सुरू होण्याची शक्यता असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे. त्याच वेळी या कारची चाचणी इतर ठिकाणी १० फेब्रुवारीपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये या कारची डिलिव्हरी फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू होऊ शकते. जर तुम्हाला ही कार बुक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला २५ हजार रुपये बुकिंग रक्कम भरावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किया सायरसचे मायलेज

या कारचे पेट्रोल (मॅन्युअल) प्रकार १८.२० किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देईल, तर DCT प्रकार १७.६८ किलोमीटरचे मायलेज देईल. जर आपण डिझेल व्हेरिएंटबद्दल बोललो तर मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट एका लिटरमध्ये १७.६५ किलोमीटर अंतर कापू शकतो. त्याच वेळी, डिझेल (ऑटोमॅटिक) व्हेरिएंटमध्ये एका लिटरमध्ये २०.७५ किलोमीटरपर्यंत धावू शकतो.