Rinku Singh Car and Bike Collection: आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा तीन विकेट्सने पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. या सामन्यात रिंकू सिंगच्या बॅटने मैदानात अक्षरक्षा धावांचा पाऊसच पडला. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत रिंकू सिंगने पाच लगातर षटकार ठोकून सामना खिशात घातला. आख्खा क्रिकेटविश्वात रिंकू सिंगच्या वादळी खेळीची चर्चा सुरु आहे. कारण, रिंकूने पाच षटकारांच्या जोरावर नवीन पाच विक्रमांना गवसणी घातली आहे.  या खेळीबद्दल शाहरुख खानसह जगभरातील लोक त्याचे अभिनंदन करत आहेत. पण तुम्हाला माहितेय का या खेळाडूला बाइक्सची प्रचंड आवड आहे. चला तर पाहूया रिंकू सिंगचे कार कलेक्शन…

रिंकू सिंगने ५ वर्षांपूर्वी बुलेट बाईक खरेदी केली होती आणि त्याची बाईक काळ्या रंगात आहे. त्याच्याकडे एक जुनी बुलेट आहे जी त्याच्यावरही छान दिसते. यात ३४६ सीसीचे सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक एअर कूल्ड पेट्रोल इंजिन आहे.

(हे ही वाचा : ‘या’ कारच्या खरेदीसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी, तुफान मागणी पाहून कंपनीला बंद करावी लागली बुकिंग, वेटिंग पीरियड २० महिन्यांवर )

हे ५२५० rpm वर १९.८ Bhp आणि ४००० rpm वर २८ Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. हे वर्तुळाकार अॅनालॉग स्पीडोमीटर, ओडोमीटर, बॅटरी इंडिकेटर आणि टेल लाइट यांसारख्या जुन्या मॉडेल्समधून वाहून जाते. लांब व्हीलबेस आणि १९-इंच चाकांमुळे रॉयल एनफील्ड बुलेट ३५० उत्तम राइड अनुभव देते. सस्पेंशनसाठी, पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला ड्युअल कॉइल स्प्रिंग देण्यात आले आहेत ज्यामुळे बाईकचा राइडिंगचा अनुभव सुधारतो.

कुटुंबाला दिली ‘ही’ कार भेट

रिंकू सिंगने ३ नोव्हेंबर २०२८ ला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट रिपोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या पहिल्या IPL कमाईतून खरेदी केलेली कार पालकांना भेट दिली. रिंकू सिंहने ४ वर्षांपूर्वी मारुती सुझुकीची ब्रेझा एसयूव्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांना दिली होती, जी लाल रंगाची आहे. त्याचे भाऊ अनेकदा ही गाडी वापरताना दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुने मारुती ब्रेझा १.३-लिटर डिझेल इंजिनसह उपलब्ध करून देण्यात आले होते जे ४,००० rpm वर ८८.५ bhp आणि १,७५० rpm वर २०० Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे पहिल्यांदा २०१६ मध्ये सादर करण्यात आले होते. नवीन Brezza बद्दल बोलायचे झाले तर १.५-लिटर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०३ bhp पॉवर आणि १३५ Nm पीक टॉर्क निर्माण करते. या कारला ५-स्पीड मॅन्युअल आणि सौम्य-हायब्रिड प्रणालीसह एक नवीन ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स मिळतो.