Mahindra Thar with Rs 1 Lakh Discount: महिंद्रा अँड महिंद्राने आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही ‘Mahindra Thar RWD’ नुकतीच भारतात लाँच केली आहे. ही महिंद्राची सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे. ज्याच्या किंमती रुपये ९.९९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू आहेत. आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Thar 4WD वर सध्या १ लाख रुपयांची आकर्षक सूट मिळत आहे.

हे ४५,००० रुपयांपर्यंत रोख सवलत किंवा ६०,००० रुपयांच्या अॅक्सेसरीज पॅकसह ऑफर केले जात आहे. यासोबतच १०,००० रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बोनस आणि १५,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. याशिवाय, कंपनी थारवर विमा फायदे आणि तीन वर्षांचे देखभाल पॅकेज देत आहे. लक्षात ठेवा की, या ऑफर फक्त LX पेट्रोल AT 4WD वर उपलब्ध आहेत, ज्याची किंमत १५.८२ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

(हे ही वाचा : 68 kmpl मायलेजवाली देशातली लोकप्रिय स्टायलिश स्कूटर फक्त १०,००० रुपयांमध्ये न्या घरी, बघा EMI किती? )

सध्या, महिंद्रा थार RWD साठी १८ महिने आणि 4WD साठी चार महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे, तर जानेवारी २०२३ पर्यंत ३७,००० थार ऑर्डर प्रलंबित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व ऑफर क्षेत्र, मॉडेल्स, डीलरशिप आणि इतर घटकांवर अवलंबून बदलतात. यासंबंधी अधिक माहितीसाठी, तुम्ही जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधू शकता.