कार सेक्टरमधल्या MPV सेगमेंट मोठ्या कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणार्‍या ६ आणि ७ सीटर कारसाठी ओळखले जाते ज्यात कार कौटुंबिक आणि व्यवसायिक कारणांसाठी वापरल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सेगमेंटमधील कारपैकी, आज आपण ज्या कारबद्दल बोलत आहोत ती मारुती एर्टिगा आहे, जी या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर कार आहे. मारुती एर्टिगा LXI व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ९,३६,३५५ इतकी असते.

जर तुम्हाला ही कार मोठ्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक वापरासाठी खरेदी करायची असेल, तर तुम्ही अतिशय सोप्या फायनान्स प्लॅनसह ती खरेदी करण्याचे संपूर्ण डिटेल्स येथे जाणून घेऊ शकता.

ऑनलाइन कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही Maruti Ertiga LXI खरेदी केली तर बँक तुम्हाला यासाठी ८,४२,३५५ रुपये कर्ज देईल. या कर्जानंतर, तुम्हाला किमान ९४,००० रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल आणि त्यानंतर दरमहा १७,८१५ रुपये मासिक EMI भरावे लागेल.

या मारुती एर्टिगा LXI वर कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने 5 वर्षांची कालमर्यादा निश्चित केली आहे. तसेच, बँक दिलेल्या कर्जाच्या रकमेवर वार्षिक 9.8 टक्के दराने व्याज आकारेल.

आणखी वाचा : Hero Electric Optima Finance Plan: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे, तर फायनान्स प्लॅनचे संपूर्ण डिटेल्स वाचा

या मारुती एर्टिगा वर उपलब्ध असलेला हा फायनान्स प्लॅन वाचून तुम्हाला तो खरेदी करायचा असेल, तर आता त्याचे इंजिन, पॉवर आणि फीचर्सची संपूर्ण माहिती वाचा.

मारुती अर्टिगाच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचं झालं तर यात 1462 cc चे 1.5 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 103 पीएस पॉवर आणि 136.8 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही मारुती अर्टिगा पेट्रोलवर 20.51 kmpl आणि CNG वर 26.11 kmpl मायलेज देते. मारुती अर्टिगाच्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यात Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

याशिवाय क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, ब्रेक असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि आयएसओ फिक्स्ड चाइल्ड सीट अँकर यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti ertiga lxi finance plan with down payment and emi read full details prp
First published on: 16-04-2022 at 16:08 IST