मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य कार कंपन्यांपैकी एक आहे. चारचाकी कारच्या विक्रीमध्ये ही कंपनी सध्या आघाडीवर आहे. मारुतीने सप्टेंबर २०२२ मध्ये एकूण १ लाख ७६ हजार ३०६ वाहनांची विक्री केली होती. ही विक्री इतर कार कंपन्यांच्या तुलनेत मोठी आहे. यातून तिची लोकप्रियता दिसून येते. दरम्यान कंपनीने आपली एक कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपली Maruti suzuki s cross ही कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंद करण्यामागे हे आहे कारण

कंपनीने एस क्रॉसला नेक्सा साईटवरून देखील काढून टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांमध्ये एस क्रॉसची एकही विक्री झालेली नाही. यातून ही कार ग्राहकांना आवडली नसल्याचे स्पष्ट होत आहे. एस क्रॉसची विक्री घटण्यामागे मारुतीने लाँच केलेली New Grand Vitara असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

(पावसात प्रवास करण्यापूर्वी बाईकमधील ‘या’ गोष्टी तपासा, सुखद आणि सुरक्षित होईल प्रवास)

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मारुतीने एस क्रॉसच्या २ हजार ५२२ युनिटची विक्री केली होती. मात्र या वर्षी ऑगस्ट महिन्यात या कारच्या विक्रीचा आकडा शुन्य आहे. तसेच, गेल्या वर्षी जुलाई महिन्यात एस क्रॉसच्या १ हजार ७२ युनिटची विक्री झाली होती. पण या वर्षी जुलै महिन्यात या वाहनाची एकही विक्री झाली नसल्याचे समजले आहे. सप्टेंबर महिन्यातही कंपनीला झिरो विक्रीलाच तोंड द्यावे लागल्याने एस क्रॉसला आपल्या वाहनांच्या यादीतून बाहेर काढावा लागले.

एस क्रॉस २०१५ पासून भारतीय कार बाजारपेठेत उपलब्ध होती. सुरुवातीला ती १.६ लिटर आणि १.३ लिटर टर्बोडिझेल इंजिनसह ग्राहकांसाठी सादर करण्यात आली होती. ग्रँड विटारामुळे एस क्रॉसला कमी पसंती मिळत असल्याचे समजले आहे. एस क्रॉसमध्ये प्रिमियम फीचर नसने हे देखील कारची सेल घटण्यामागील एक कारण असू शकते. कंपनीने कारची विक्री वाढवण्यासाठी ४२ हजार रुपयांची सूट देखील दिली होती. मात्र काही फरक पडला नाही, हे आकड्यांमधून दिसून येत आहे.

(वेळ दवडू नका, कार घेण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करा, पुढील वर्षी ‘या’ कारणांमुळे वाढणार किंमती)

एस क्रॉसचे फीचर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस क्रॉसमध्ये रेन सेन्सिंग वाइपर, क्रुज कंट्रोल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, ७ इंज टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्ट हे फीचर होते. कारमध्ये १.५ लिटर इंजिन आहे जे १०५ पीएसची शक्ती आणि १३८ एनचा टॉर्क देते. एस क्रॉसने युरो एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार एडल्ट प्रोटेक्शन रेटिंग मिळवली होती. या कारची एक्स शोरूम किंमत ८.९५ रुपये ते १२.९२ लाख रुपये इतकी आहे.