चारचाकी गाडी घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. यासाठी पैशांची जुळवाजुळव किंवा वाहन कर्ज घेऊन गाडी खरेदी केली जाते. मात्र असं असलं तरी गाडी चालवायची कशी? असा प्रश्न असतो. जर तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल आणि तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचे ड्रायव्हिंग कोर्स आहेत. येथे आपण प्रवेशासह प्रोफेशनल पद्धतीने गाडी चालवण्यास शिकू शकता. यासाठी कंपनीने चार कोर्स तयार केले आहेत. या कोर्सची फी वेगवेगळी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या कोर्सबद्दल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लर्नर स्टँडर्ड ट्रॅक कोर्स- या कोर्सची फी ५५०० रुपये इतकी आहे. हा कोर्स ज्या लोकांनी कधीही गाडी चालवली नाही, अशा लोकांसाठी आहे. यात सुरुवातील वाहतूक नियम आणि ऑन रोड ड्रायव्हिंग करत अनुभव मिळतो. हा बेसिक कोर्स शिकल्यानंतर ड्रायव्हिंग परवाना मिळवू शकता. यामुळे आरटीओत ड्रायव्हिंग टेस्ट देताना आत्मविश्वास वाढतो. या कोर्समध्ये १० प्रात्यक्षिक सत्रे होतात. या व्यतिरिक्त ४ थेअरी आणि ५ सिम्यूलेटर सत्रे होतात. हा कोर्स २१ दिवसांचा आहे.

लर्नर एक्सटेंडेड कोर्स- या कोर्सची फी ७५०० रुपये आहे. हा कोर्स ज्यांनी कधीही ड्रायव्हिंग केले नाही त्यांच्यासाठी आहे. हा २६ दिवसांचा कोर्स आहे. मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूलच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, त्याच्या ३१ दिवसांच्या कोर्सला लर्नर डिटेल ट्रॅक कोर्स म्हणतात. १५ प्रात्यक्षिक सत्रे, ५ सिम्युलेटर सत्रे आणि ४ थेअरी सत्रे असतील.

Royal Enfield Classic 350 VS Honda Hness CB350: किंमत, स्टाइल आणि मायलेजमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या

लर्नर डिटेल कोर्स- या कोर्सची फी ९ हजार रुपये आहे. हा कोर्स ३१ दिवसांचा असून २० प्रात्यक्षिक सत्रे, ५ सिम्युलेटर सत्रे आणि ४ थेअरी सत्रे असतील. हा कोर्स ज्यांनी कधीही ड्रायव्हिंग केले नाही त्यांच्यासाठीही आहे.

अ‍ॅडव्हान्स कोर्स- मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल हा कोर्स ज्यांच्याकडे परवाना आहे पण एकट्याने गाडी चालवताना आत्मविश्वास कमी आहे , अशांसाठी आहे. या कोर्सची फी ४००० रुपये आहे. या कोर्समध्ये १ प्रात्यक्षिक परीक्षा, ६ प्रात्यक्षिक सत्रे आणि २ थेअरी सत्रे आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki driving course and fees details rmt
First published on: 05-01-2022 at 12:19 IST