ग्रँड विटारा एसयूव्ही ही मारुती सुझुकीची प्रमुख कार आहे. टोयोटाच्या सहकार्याने विकसित केलेली हायब्रीड एसयूव्ही कंपनीने गेल्या वर्षी लाँच केली होती. अलीकडेच, मारुती सुझुकीने जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांना नवीन ग्रँड विटारा एसयूव्ही सादर केली आहे. या कारच्या चाव्या स्वतः कंपनीचे सीईओ-एमडी हिसाशी ताकेउची यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या.

ग्रँड विटारा ‘अशी’ आहे खास

ग्रँड विटारा माईल्ड हायब्रिडमध्ये १.५-लिटर, ४-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते जे १०१ bhp पॉवर आणि १३८.८ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. या इंजिन वेरिएंटमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम देखील मिळते.

(हे ही वाचा : Xiaomi च्या इलेक्ट्रिक कारची लाँचिंगपूर्वीच दिसली पहिली झलक, कंपनीने पुरवठादाराला ठोठावला ‘इतका’ दंड!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय बाजारपेठेत, ग्रँड विटारा टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, स्कोडा कुशाक आणि एमजी हेक्टरशी स्पर्धा करते. ग्रँड विटारा त्याच्या किंमती विभागात महिंद्रा XUV700, Tata Harrier आणि MG Hector सारख्यांना टक्कर देते.

ग्रँड विटारा किंमत

ग्रँड विटारा १०.४५ लाख रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत, एक्स-शोरूम लाँच करण्यात आली. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १९.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने सौम्य-हायब्रीड, स्ट्राँग-हायब्रिड आणि सीएनजी इंजिनमध्ये एकूण ६ प्रकारांमध्ये ते सादर केले आहे. यामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा, झेटा प्लस, अल्फा आणि अल्फा प्लस प्रकारांचा समावेश आहे.