सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपन्या अनेक नवनवीन मॉडेल्स सादर करत असतात. तसेच प्रत्येक कंपनी प्रत्येक महिन्याला आपल्या विक्रीचा रिपोर्ट सादर करत असते. मारुती सुझुकी भारतातील एक प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी आहे. भारतातील मोठी कार उत्पादक असणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाने ऑगस्ट २०२३ मध्ये एकूण १,८९,०८२ युनिट्सची विकी केली आहे. या विक्रीमधून कंपनीने आतापर्यंतची सर्वात जास्त मासिक विक्रीची नोंद केली आहे. एकूण विक्रीपैकी १,५८,६७८ युनिट्सची विक्री देशांतर्गत बाजारात झाली आहे तर २४,६१४ युनिट्स निर्यात झाले आहेत. तसेच कार निर्मात्याने ५,७९० युनिट्स OEM (मूळ उपकरण ) उत्पादकांना विकली आहेत.

देशांतर्गत बाजारात ब्रॅंड्सची विक्री सुरू ठेवत कंपनीने आपल्या कॉम्पॅक्ट सेडान आणि एंट्री लेव्हल हॅचबॅकच्या विक्रीमध्ये वर्ष-दर-वर्ष घट पहिली आहे. तथापि एसयूव्हीच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अल्टो आणि एस-प्रेसो (मिनी सेगमेंट) ची एकत्रित विक्री या महिन्यात १२,२०९ युनिट्स इतकी आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ती २२,१६२ इतकी होती. याबाबतचे वृत्त carandbike ने दिले आहे.

हेही वाचा : Car Sales In July 2023: ‘या’ पाच कंपन्यांचा भारतीय वाहन बाजारात दबदबा, टोयोटाकडून किआला धोबीपछाड

कंपनीच्या सियाझ कॉम्पॅक्ट सेडानची विक्री देखील ऑगस्ट २०२३ मध्ये १,५१६ वरून ८४९ युनिट्स इतकी झाली आहे. कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये बलेनो, सेलेरियो, डिझायर,स्विफ्ट आणि वॅगनआर यांची एकूण विक्री ७२,४५१ युनिट्स इतकी आहे. ऑगस्ट २०२२ च्या तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे. युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही + MPV) सेगमेंटच्या ऑगस्ट २०२३ मध्ये ५८,७४६ युनिट्सची विक्री झाली आहे. मागच्या वर्षी हीच आकडेवारी २६,९३२ इतकी होती. तसेच व्हॅन सेगमेंटमध्ये ऑगस्ट २०२३ मध्ये ११,८५९ युनिट्सची विक्री झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाइट कर्मशिअल वाहनांच्या सेगमेंटमध्ये ऑगस्ट २०२३ मध्ये सुपर कॅरीच्या २,५६४ युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ३,३७१ युनिट्स इतकी होती. मिड साइझ सेगमेंट (सियाझ) ची विक्री अर्थी वर्ष २०२४ मध्ये ५,५६७ ने वाढून ५,९५० युनिट्सपर्यंत वाढली आहे. तर व्हॅन सेगमेंटमध्ये ५६,८१३ युनिट्सवरून याची विक्री ५६,५७२ युनिट्स इतकी झाली आहे. व्हॅनच्या विक्रीत किरकोळ घट पाहायला मिळत आहे. युटिलिटी वाहनांची विक्री आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १,३१,०५६ युनिट्सनी वाढून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २,४७,१९६ युनिट्सवर गेली आहे.