देशात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. त्यातही सीएनजी गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. मारुती सुझुकीने आता सीएनजी व्हर्जनमध्ये सात सीटर कार ‘मारुती सुझुकी एक्सएल ६ सीएनजी’ लाँच केले आहे. मारुती सुझुकी एक्लएल ६ सीएनजी कार झेटा व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली असून या मॉडेलची किंमत १२.२४ लाख रुपये इतकी आहे. ग्राहकांना मारुती सुझुकीच्या एक्सएल ६ सीएनजीसाठी ३०,८२१ रुपये प्रति महिना सबस्क्रिप्शन प्रोग्राम निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी एक्सएल ६ सीएनजी कारची वैशिष्ट्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • मारुती सुझुकी एक्सएल ६ या कारचं मायलेज २६.३२ किमी प्रति किलो इतकं आहे. या कारमध्ये १.५ लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन तसेच फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देण्यात आलं आहे. तसेच यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सुझुकी कनेक्ट, क्रूझ कंट्रोल, ४ एअरबॅग्ज आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट्ससह ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे.

आणखी वाचा : होंडा आणतेय नवीन दमदार कार; मारुतीच्या ब्रेझाशी होणार जोरदार टक्कर, पाहा कधी होणार सादर

  • नवीन मारुती सुझुकी एक्सएल ६ सीएनजी दिसायला हुबेहूब पेट्रोल मॉडेलप्रमाणे आहे. कारला समोरच्या लोखंडी जाळीवर ट्विन क्रोम स्ट्रिप्स, खालच्या अर्ध्यावर प्लॅस्टिक क्लेडिंग आणि चाकांच्या कमानी, छतावरील रेल आणि नवीन हेडलाइट्ससह मस्क्यूलर फ्रंट स्ट्रिप मिळते.
  • बाह्य वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये १६-इंच अलॉय व्हील, पुढील आणि मागील स्किड प्लेट्स, DRLs सह एलईडी हेडलॅम्प, शार्क-फिन अँटेना आणि इंडिकेटरसह शरीर-रंगीत ORVM समाविष्ट आहेत.
  • मारुती सुझुकी एक्सएल ६ ला संपूर्ण-काळा इंटीरियर, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिक्लिन करता येण्याजोग्या थर्ड-रो सीट्स, दुसऱ्या रांगेतील व्हेंटसह ऑटोमॅटिक एसी, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह ७-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.