देशातील कार क्षेत्रात सर्वाधिक मागणी हॅचबॅक सेगमेंटमध्ये येणाऱ्या कारना आहे. या गाड्यांना प्रचंड मागणी असण्याचे कारण म्हणजे त्यांची कमी किंमत आणि जास्त मायलेज. हे लक्षात घेऊन जवळपास प्रत्येक कार उत्पादक कंपनीने या सेगमेंटमध्ये आपली कार लॉंच केली आहे. या हॅचबॅकमध्ये असलेल्या कार्सपैकी आम्ही या सेगमेंटमधील लोकप्रिय मारुती वॅगनआरच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारबद्दल बोलत आहोत, ज्याला तिच्या बूट स्पेस आणि केबिन स्पेस व्यतिरिक्त किंमत, मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते.
मारुती वॅगनआरचा ZXI प्लस हा या कारचा सर्वाधिक विक्री होणारा व्हेरिएंट आहे, ज्याची सुरुवातीची किंमत ६, ५८,००० रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली) जी ऑन रोड असताना ७,४०,२०९ रुपयांपर्यंत जाते.
जर तुम्हाला ही सर्वाधिक विक्री होणारी WagonR खरेदी करायची असेल तर तुम्ही एकाच वेळी ७ लाख रुपये खर्च न करता सहज डाउन पेमेंट आणि EMI सह घरी घेऊ शकता.
आणखी वाचा : Top 3 Best Cheapest Bikes India: कमी किमतीत १०४ kmpl पर्यंतचे मायलेज देणाऱ्या या आहेत टॉप ३ बाईक
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही मारुती WagonR ZXI Plus फायनान्स प्लॅन अंतर्गत खरेदी केली तर बँक यासाठी ६,६६,२०९ रूपयांचे कर्ज देईल.
कर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून ७४,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर दरमहा १४,०९० रूपये मासिक ईएमआय द्यावा लागेल.
मारुती WagonR ZXI Plus वर या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. या ५ वर्षांमध्ये बँक दिलेल्या कर्जावर वार्षिक ९.८ टक्के दराने व्याज आकारेल.
आणखी वाचा : Mahindra Scorpio खरेदी करायचीय? पण बजेट नाही, मग तुम्ही ही SUV फक्त ४ लाखात घरी घेऊन जाऊ शकता
फायनान्स प्लॅनद्वारे उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट, व्याजदर आणि EMI योजनेचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्ही या मारुती WagonR ZXI Plus चे इंजिनपासून मायलेजपर्यंतचे संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
मारुती WagonR ZXI Plus मध्ये ११९७ CC चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८८.५० bhp पॉवर आणि ११३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही कार २३,५६ kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.