Maruti Suzuki sales in December 2023: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने डिसेंबर २०२३ मध्ये १ लाख ३७ हजार ५५१ वाहनांची विक्री केली. जे मागील वर्षी याच वेळी विकल्या गेलेल्या १ लाख ३९ हजार ३४७ युनिटच्या तुलनेत १.२ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांबद्दल बोलायचे तर कंपनीने १ लाख ०४ हजार ७७८ युनिट्स विकल्या. तर डिसेंबर २०२२ मध्ये हा आकडा १ लाख १२ हजार ०१० युनिट्सच्या विक्रीचा होता. म्हणजे गेल्या महिन्यात ६.४ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते.

तथापि, २०२३ च्या शेवटच्या महिन्यात विक्रीत घट होऊनही, कंपनीने प्रथमच आर्थिक वर्ष २०२३ मध्ये दोन लाख विक्रीचा टप्पा ओलांडला, ज्यामध्ये सर्वाधिक २ लाख ६९ हजार ०४६ युनिट्सची निर्यात देखील समाविष्ट होती. तथापि, मिनी आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटच्या मागणीत थोडीशी घट झाली आहे. परंतु ज्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये कंपनीने नवे पाऊल उचलले आहे, त्याने इतर सेगमेंटमधील घसरणीची भरपाई केली आहे. याशिवाय निर्यातीतही ४.९९ टक्के वाढ दिसून आली. कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १ लाख ९४ हजार ६१४ युनिट्सची विक्री केली होती. तर गेल्या महिन्यात २ लाख ०४ हजार ३२७ मोटारींची विक्री झाली.

(हे ही वाचा: Hyundai ने खेळला नवा गेम, देशातील बाजारात येणाऱ्या अधिक सुरक्षित असलेल्या SUV ची केली बुकिंगच सुरु, किंमत…)

मिनी/कॉम्पॅक्ट सेगमेंटबद्दल बोलत आहोत, ज्यात मारुतीच्या अल्टो, बलेनो, डिझायर आणि वॅगन-आर कारचा समावेश आहे. यामध्ये कंपनीने डिसेंबर २०२३ मध्ये ४८,२९८ मोटारींची विक्री केली, जी डिसेंबर २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ६७ हजार २६७ कारच्या तुलनेत खूपच कमी होती. जर आपण सेडान विभागाबद्दल बोललो तर कंपनीकडे फक्त एक सियाझ आहे ज्याची ४८९ युनिटची विक्री झाली. तर गेल्या वर्षी याच वेळी १,५५४ युनिट्सची विक्री झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारुती सुझुकीच्या SUV सेगमेंटबद्दल बोलताना, मारुती सुझुकीने २०२३ मध्ये दोन नवीन Maruti SUV Fronx आणि Jimny लाँच केले. याशिवाय एक Maruti Invicto MPV देखील लाँच करण्यात आली. डिसेंबर मधील त्यांच्या विक्रीबद्दल बोलताना, कंपनीने देशांतर्गत बाजारात SUV/MPV च्या ४५ हजार ९५७ युनिट्सची विक्री केली, जी डिसेंबर २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या ३३,००८ युनिट्सच्या तुलनेत ३२.७९ टक्के अधिक होती.