गेल्या काही काळापासून कार्सची चांगली विक्री होत आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग चांगली कामगिरी करत आहे. अनेक नवीन गाड्या बाजारात आल्या आहेत. यावर्षीही आतापर्यंत अनेक गाड्या लाँच झाल्या आहेत. बहुतांश कार कंपन्यांच्या विक्रीतही तेजी दिसून येत आहे. कार विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, ह्युंदाई कंपनीच्या गाड्यांच्या विक्रीत मोठी वाढ झालेली दिसून आली.

एकीकडे मारुती सुझुकी आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या भारतीय कार बाजारात लाखो वाहनांची विक्री करत असताना, दुसरीकडे काही कंपन्या अशा आहेत ज्यांची विक्रीच्या बाबतीत स्थिती खालावली आहे. फ्रेंच कार निर्माता कंपनी सिट्रोएनला भारतात कार विकण्यात खूप अडचणी येत आहेत. कंपनीच्या बजेट कार्ससोबतच प्रीमियम कारच्या विक्रीतही घट होत असल्याचे चित्र आता समोर आले आहे.

(हे ही वाचा: ६.५ लाखाच्या ‘या’ कारनं Punch, Creta चं संपवलं वर्चस्व! खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा, मायलेज २५.७५ किमी )

मे २०२४ मध्ये Citroen C5 Aircross ला एकही ग्राहक सापडला नाही. याचा अर्थ या कारची विक्री ० युनिटवर आहे. ही कंपनीची टॉप-लाइन प्रीमियम एसयूव्ही आहे. या वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांत या कारच्या केवळ २ युनिटची विक्री झाली. मे महिन्यात इतर Citroen कारची विक्री किती झाली ते जाणून घ्या…

‘ही’ सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार

Citroen च्या लाइनअपमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार eC3 होती, जी कंपनीच्या C3 चे इलेक्ट्रिक मॉडेल आहे. गेल्या महिन्यात या कारची एकूण विक्री २३५ युनिट्स होती. इतर मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर C3 च्या १५५ युनिट्सची आणि C3 एअरक्रॉसच्या १२५ युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली आहे. एकूणच, सिट्रोएनने मे महिन्यात ५१५ मोटारींची विक्री नोंदवली आहे.

Citroen C5 Aircross: इंजिन आणि वैशिष्ट्ये

Citroen C5 Aircross ची किंमत ३६.९१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ३७.६७ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. या कारमध्ये २.० लिटर डिझेल इंजिन आहे जे १७७ पीएस पॉवर आणि ४०० Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये फक्त ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे.

कारच्या काही खास वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, १२.३-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग, पॅनोरमिक सनरूफ आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षेच्या दृष्टीने, यात सहा एअरबॅग्ज, ड्रायव्हर ड्रॉसीनेस डिटेक्शन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), हिल असिस्ट, पार्क असिस्ट, रियर पार्किंग कॅमेरा आणि ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन सिस्टम यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.