एमजी मोटर इंडिया अधिकृतपणे MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक लाँच करणार आहे. जे आगामी काळात होणाऱ्या Auto Expo२०२३ या शो मध्ये हॉल नंबर १५ मध्ये लाँच केले जाणार आहे. या शो मध्ये अनेक इंटरेस्टिंग कार्स असणार आहेत. MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार मोडायलर स्केलेबल प्लॅटफॉर्म (MSP) वर आधारित असणार आहे. ही कार टेक्नॉलॉजीमध्ये सर्वाधिक प्रगत कार असेल असा दावा MG ने केला आहे.

एमजी ४ हॅचबॅक इलेक्ट्रिक कारमध्ये स्वीप्ट-बॅक हेडलाइट्स आणि वेगळे डिझाईन असणार आहे. EV मध्ये ट्रॅडिशनल हेडलाईट्सच्या खाली फॉग लॅम्प्स आणि आकर्षक बंपर असणार आहे. एमजी ४ मध्ये ६४ kWh क्षमतेची बॅटरी आहे. ज्याची विक्री युकेमध्ये होणार आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर ४५० किमी धावू शकेल असा दावा एमजीने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

MG 4 ही कार E, SE लाँग रेंज आणि ट्रॉफी लाँग रेंज या तीन ट्रीम्समध्ये उपलब्ध आहे. एमजी सध्या ZS EV हे मॉडेल विकते ज्याची किंमत २२. ५८ लाख आहे.