How to maintain a new car: देशात दरवर्षी लाखो कार विकल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन वर्ष २०२५ मध्ये स्वतःसाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.नेक वेळा नवीन गाडी खरेदी केल्यानंतर आणि घरी आणल्यानंतर लोक अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना नंतर मोठे नुकसान सहन करावे लागते. नवीन गाडी खरेदी केल्यानंतर तिची काळजी कशी घ्यावी, तसेच नवीन कार खरेदी करायच्या आधी काय लक्षात ठेवावे याबद्दलच्या काही टिप्स जाणून घेऊयात.

मॅन्युअल बुक आधी रीड करा

वाहन उत्पादक नवीन कारसोबत मॅन्युअल बुक देतात. कार खरेदी करताना मॅन्युअल बुक आधी रीड करा. कारची संपूर्ण माहिती मॅन्युअल बुकमध्ये दिली जाते. यामध्ये, गाडीमध्ये कोणत्या क्वालिटीचे इंजिन ऑइल वापरावे, ते कधी बदलावे, सर्व्हिस होईपर्यंत टायर प्रेशरची माहिती असे या मॅन्युअल बुक असते.

गाडीत भरपूर सामान भरू नका

गाडीमध्ये गरजेपेक्षा अधिक सामान भरणे गाडीच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. वाहनामध्ये अतिरिक्त वजन आल्यास गाडी अधिक प्रमाणात इंधनाचा वापर करते. तसेच वाहन सुरळीत काम करण्यासाठी इंजिनदेखील अधिक ताण घेते. असे होऊ नये यासाठी विचार करून, मोजके सामान आपल्या गाडीमध्ये भरावे.

इतर जड वाहनांना टो करू नका

नव्या कोऱ्या गाडीने कधीही इतर वाहनांना टो करू नये. तुमच्या गाडीपेक्षा जर समोरची गाडी अधिक वजनाची असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वाहनावर होतो. तसेच, कोणत्याही वाहनास टो करताना इंजिनवर अतिरिक्त ताण येतो. इंजिन अधिक ऊर्जेचा आणि इंधनाचा वापर करते. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या वाहनाच्या आरोग्यावर होतो. जर तुम्हाला कधी दुसऱ्या गाडीला टो देण्याची वेळ आलीच तरी थोड्या अंतरापर्यंत मदत करावी.

पाण्यातून गाडी चालवू नये

पाणी कोणत्याही गाडीची स्थिती लवकर खराब करत असते. त्यामुळे पावसाळ्यात, पाणी साचलेल्या भागांमधून आपले वाहन नेणे टाळावे. पाण्यामुळे, गाडीतील वायर्स, इंजिन, बॅटरी किंवा गाडीतील इतर कोणत्याही फीचर्स सहज खराब करू शकते. परिणामी तुमच्या गाडीचे आयुष्य कमी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो भरपूर पाऊस असल्यास, पाणी साचले असल्यास गाडीचा वापर टाळावा.

कार घेण्याआधी काय काळजी घ्याल?

सर्वात आधी पूर्ण रिसर्च करा

नवीन वर्षात कार कंपन्या नवीन कार्स लाँच करतात. २०२५ च्या सुरुवातीनंतर आता नवीन टेक्निक आणि डिझाइन तसेच फीचर्स असलेल्या कार कंपन्यांकडून लाँच केल्या जाता. अशा परिस्थितीत कोणतेही कार खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण रिसर्च करा आणि तेव्हाच नवीन कार घरी आणा

या गोष्टी ठेवा लक्षात

केवळ कारची डिझाइन, फीचर्स आणि किंमत पाहून गाडी खरेदी करु नये. तुम्ही ज्या कारची निवड केली आहे ती तुमच्यासाठी आणि कुटूंबासाठी सेफ आहे का? बजेटमध्ये आहे का? याची पडताळणी करणे गरजेचे आहे. जर असे असेल तेव्हाच तुम्ही कार खरेदी करा.

ऑन-रोड प्राईज सर्वात आधी तपासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जरी देशातील सर्व कंपन्या त्यांची वाहने एक्स-शोरूम किमतीत विकतात परंतु वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या टॅक्समुळे कारची ऑन रोड किमतीत बरीच तफावत होऊ शकते. त्यामुळे कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी ती कार इतर कोणत्याही राज्यात कमी किमतीत उपलब्ध आहे का याकडेही लक्ष द्या. जर फरक जास्त असेल तर तिथून कार खरेदी करून तुम्ही हजारो ते लाखो रुपये वाचवू शकता.