तुम्हाला आरटीओशी संबंधीत एखादे काम करायचे असेल तर आता तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. आता ही कामे तुम्हाला घरबसल्या करता येणार आहेत. मात्र, यासाठी आधार कार्ड बंधनकारक असणार आहे. आधार पडताळणीद्वारे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहन चालविण्याचा परवाना, वाहन नोंदणी यांसारख्या ५८ सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या मारणे होणार बंद

सरकारी कार्यालयांना भेट न देता संपर्करहित पद्धतीने अशा सेवा प्रदान केल्याने नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचेल. याशिवाय प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये जाणाऱ्यांची संख्याही कमी होईल, त्यामुळे कामाची परिणामकारकता वाढेल.

हे ही वाचा : ड्रायव्हिंग लायसन्समध्ये चूक झाली? आता आरटीओत जाण्याची गरज नाही! घरीच बसा..आणि बदला ड्रायव्हिंग लायसन्समधील पत्ता!

घरबसल्या या सेवांचा लाभ घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या ऑनलाइन सेवांसाठी नागरिक स्वेच्छेने आधार पडताळणी करू शकतात त्यामध्ये शिकाऊ परवाना, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत आणि ड्रायव्हिंग दाखविल्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण यासारख्या सेवांचा समावेश होतो. तसेच, ज्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नाही तो इतर काही ओळखीचा पुरावा दाखवून थेट सेवांचा लाभ घेऊ शकतो.