Odysse हा मुंबई स्थापन झालेला इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप असून व्होरा कंपनी समुहाचा एक भाग आहे. हा पूर्णपणे-इलेक्ट्रिक वाहतूक प्लॅटफॉर्म असून यामध्ये जगभरातील आघाडीच्या ई. व्ही. कंपोनंट उत्पादकांची आणि तंत्रज्ञांची सांगड घालण्यात आली आहे. Odysse कंपनीने आपली नवीन हाय स्पीड इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य सोहळ्यामध्ये ओडिसी वेडर लॉन्च करण्यात आली. तर या नवीन हाय स्पीड इलेक्ट्रिक बाईक फीचर्स आणि किती किंमतीत ती भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आली आहे हे जाणून घेऊयात.

ओडिसी वेडर बाईकला भारतामध्येच तयार करण्यात आले आहे. याचे तुम्हाला बुकिंग करायचे असल्यास आजपासून ऑनलाईन किंवा कंपनीच्या ६८ डिलर्सकडे जाऊन फक्त ९९९ रुपये इतकी आगाऊ रक्कम भरून बुक करता येणार आहे. या बाईकची डिलिव्हरी जुलै २०२३ पासून सुरु होणार आहे.

first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
blue pebble and radiowalla ipo will open at the end of the month
महिनाअखेर दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार; ब्लू पेबल’चा विस्तार योजनेसाठी १८.१४ कोटींचा आयपीओ
Prohibition of new investment flow in ETFs that have investments abroad
परदेशात गुंतवणूक असणाऱ्या ‘ईटीएफ’मध्ये नवीन गुंतवणूक ओघाला प्रतिबंध; ‘सेबी’च्या फर्मानाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी

हेही वाचा : Odysse E-Scooter: ओडिसीची नवीन ई-स्कूटर वाहणार २५० किलोचे वजन, एकदा चार्ज झाली की धावणार ‘इतके’ अंतर, जाणून घ्या

ओडिसी वेडर बाईक हे एक इलेक्ट्रिक मोटर आहे. जे तासाला ८५ किमी प्रतितास इतका स्पीड प्राप्त करू शकते. यामध्ये ४.५० KW ची बॅटरी आणि १७० न्यूटन मीटर इतके टॉर्क जनरेट करते. यामध्ये फॉरवर्ड, रिव्हर्स आणि पार्किंग असे ३ ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत.

ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. नेमिन व्होरा, ह्यावेळी, म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत आणि नवोन्मेषकारी मोटरसायकल व्हॅडर सर्वांपुढे आणणे माझ्यासाठी थरारक अनुभव आहे. सर्वांना उपलब्ध होण्याजोगे शाश्वत व परवडण्याजोगे वाहतुकीचे पर्याय पुरवणे हे आमचे ध्येय आहे. प्रत्येक जण चालवू शकेल असे परवडण्याजोग्या दरातील उत्पादन निर्माण करणे ही ह्या ध्येयाच्या दिशेने जाणारी पहिली पायरी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान अत्युत्कृष्ट किमतीला बाजारपेठेत आणून, सर्व रायडर्ससाठी, वाहतूक अधिक कार्यक्षम करण्यात व्हॅडर उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते. ओडिसीची नवीन व्हॅडर अखंडित कनेक्टिविटी व शक्तिशाली धावण्याच्या क्षमतांमुळे रायडर्सना त्यांच्या प्रवासावर पूर्ण नियंत्रण मिळवून देईल आणि वाहतुकीचा एक सोयीस्कर तरीही समाधानकारक पर्याय त्यांना देईल.”

ते पुढे म्हणाले, “फेम-II मंजुरीप्राप्त वेगवान मोटरबाइक व्हॅडरसह आमच्याकडे २०२३ ह्या वर्षासाठी एक रोमांचक नवीन उत्पादनाची मालिकेचे नियोजन आहे. २०२३ सालाच्या तिसऱ्या तिमाहीत इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याची आमची योजना आहे. ह्या वर्षाच्या अखेरीपर्यंत आमचे डीलरशिप नेटवर्क १५० हून वाढवण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे आणि ह्यामुळे आमची विक्री किमान ३०० टक्के वाढेल असे आम्हाला अपेक्षित आहे.”

हेही वाचा : IPL 2023: आयपीएलदरम्यान प्रत्येक मैदानात Tata ची ‘ही’ कार मिरवणार, बनली अधिकृत भागीदार

ओडिसी व्हॅडर इलेक्ट्रिक मोटरबाइकमध्ये ७ इंची अँड्रॉइड डिस्प्ले, गूगल मॅप्स नेव्हिगेशन, १८ लिटर क्षमतेची प्रचंड साठवणीची जागा, ओटीओ अपडेट, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे आणि ही बाइक अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच ही आज उपलब्ध असलेल्या सर्वांत सर्वसमावेशक ई-बाइक्सपैकी एक आहे. एलईडी लायटिंग, रिनजरेटिव ब्रेकिंग ह्यांसारखी प्रगत तंत्रज्ञाने आणि वापरण्यासाठी सोपी अशी बॅटरी व्यवस्थापन प्रणाली ह्यांच्यासह व्हॅडरमध्ये अपवादात्मक दर्जाचे सुरक्षितता उपाय व नवीनतम सुविधा आहेत आणि हे सर्व परवडण्याजोग्या किंमतीत उपलब्ध आहे.

काय आहे किंमत ?

ही बॅटरी ४ तासांत पूर्ण चार्ज होते. AIS -156 मंजुरीप्राप्त बॅटरी पॅकमुळे अतुलनीय वेगवान चार्जिंग होते आणि दैनंदिन प्रवासासाठी ही बाइक अत्यंत भरवशाची ठरते. ओडिसी व्हॅडर हे भारतात तयार झालेले अर्थात मेक इन इंडिया उत्पादन असून त्याची किंमत ही एक्स-शोरूम अहमदाबाद) १,०९,९९९ रुपये असणार आहे.