ओलाच्या स्कुटर्सनी भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. कंपनीच्या स्कुटर्स लोकांना भुरळ घालत आहेत. ऑक्टोबर महिन्यात स्कुटर विक्रीच्याबाबतीत ओलाने पहिले स्थान पटकवले. ओलाने ऑक्टोबर महिन्यात १५ हजार ९५ ई स्कुटर्सची विक्री केली होती. कंपनी स्कुटरसह आता इतर वाहनांच्या निर्मितीकडे वळली आहे. ओला ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक कार उपलब्ध करणार आहे. या वाहनाचा टीझरही जारी करण्यात आला होता. कार अंदरून आणि बाहेरून आधुनिक दिसून येते. कार कधी लाँच होणार याची वाट पाहत असताना कंपनीने आता नव्या उत्पादनावर काम करणार असल्याचे समोर आले आहे.

कंपनीचे सीईओ भाविष अगरवाल यांनी ट्विट करून या नव्या उत्पदनाबाबत संकेत दिले आहे. ट्विटमधून कंपनी इलेक्ट्रिक बाईकवर काम करत असल्याचे कळत आहे. ‘बिल्डिंग सम’ असे लिहून त्यापुढे बाईकची इमोजी असलेली पोस्ट भाविष यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. अगरवाल यांनी बाईकबाबत ट्विटरवर पोल देखील केला आहे. कोणती बाईक स्टाईल तुम्हाला आवडेल, असा प्रश्न करत त्यांनी पोल घडवला. यामध्ये स्पोर्ट, क्रुझर, अडव्हेन्चर आणि कॅफे रेसर असे पर्याय देण्यात आले होते. यावरून ओला कारबरोबरच आता इलेक्ट्रिक बाईक निर्मिती क्षेत्रातही शिरू पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(तक्रारी काही संपेना; आता ‘या’ समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅपल लाँच करणार १६.१.१ अपडेट)

कंपनीने अद्याप तिच्या आगामी इलेक्ट्रिक बाईक्सबाबत खुलासा केलाला नाही. पण काही अहवालांनुसार, कारपूर्वी इलेक्ट्रिक बाईक लाँच होऊ शकते. २०२४ मध्ये इलेक्ट्रिक कार आणण्याची कंपनीची योजना आहे.

या वर्षी दिवाळीमध्ये ओला एस १ च्या लाँचवेळीच अगरवाल यांनी कंपनी बाईक निर्मितीवर काम करणार असल्याचे सांगितले होते. पुढील १२ महिन्यांत आम्ही सर्व दुचाकी श्रेणी जसे, स्कुटर, बाईक्स, स्पोर्ट बाईक आणि इतर श्रेणीमध्ये ईव्ही उत्पादने तयार करू, असे अगरवाल म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या ओलाच्या इलेक्ट्रिक उत्पादनांमध्ये ओला एस १, ओला एस १ प्रो आणि स्वस्त ओला एस १ एअरचा समावेश आहे. कंपनीने मुव्ह ओएस ३ हे ऑपरेटिंग सिस्टिम देखील लाँच केले आहे. ऑपरेटिंग सिस्टिममध्ये प्रॉक्झिमिटी अनलॉक, फास्ट चार्जिंग आणि पार्टी मोड फीचर्स मिळतात.