दिग्गज ऑटो कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आपल्या Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर एक चांगली ऑफर (offer) आणली आहे. जर तुम्ही एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. भारतातील सर्वात मोठी ईव्ही कंपनी ओला इलेक्ट्रिकने ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या स्कूटरवर आकर्षक सवलत आणि ऑफर जाहीर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर १०,००० रुपयांची सूट

ओला इलेक्ट्रिक त्यांच्या S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर १०,००० रुपयांची सूट देत आहे. याशिवाय कंपनीने आपल्या स्कूटरवर आकर्षक फायनान्स आणि एक्सचेंज ऑफरही जाहीर केल्या आहेत. ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कंपनी Ola S1 Pro च्या खरेदीवर १०,००० रुपयांची सूट देत आहे. त्याच वेळी, ग्राहकांना S1 Pro च्या खाकी एडिशन ई-स्कूटरवर ५,००० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. तुम्ही Ola S1 Pro खाकी एडिशन स्कूटर विकत घेतल्यास, स्कूटरच्या एक्स-शोरूम किमतीवर तुम्हाला एकूण १५,००० रुपयांची सूट मिळू शकते.

(हे ही वाचा : स्पोर्ट्स बाईक घ्यायच्या विचारात आहात, 30 हजारात घरी आणा Yamaha ची जबरदस्त फीचर्सवाली बाईक )

शून्य डाउन पेमेंटसह स्कूटर खरेदी करा

ओलाने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर शून्य डाऊनपेमेंट ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत आता ग्राहक कोणतेही पैसे न भरता स्कूटर घरी घेऊन जाऊ शकतात. कर्जावर खरेदी केलेल्या स्कूटरवर कंपनीने कमी ईएमआय ऑफरही दिल्या आहेत. ग्राहक आता Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर फक्त २,४९९ च्या मासिक EMI वर खरेदी करू शकतात.

एक्सचेंजवर मिळवा आकर्षक सवलत

Ola S1 Pro खाकी एडिशन वर सवलती व्यतिरिक्त, Ola ने एक्सचेंज ऑफर देखील जाहीर केली आहे. Ola S1 सह कोणत्याही पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक स्कूटरची देवाणघेवाण केल्यास ग्राहक 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. ही ऑफर 26 ते 29 जानेवारी या मर्यादित कालावधीसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर लागू आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ola electric has announced its republic day offer on ola s1 pro electric scooter is offering rs 15 000 extra discount pdb 95
First published on: 27-01-2023 at 19:27 IST