Ola S1 Scooter: केवळ ४९९ रुपयांमध्ये बूक करा ओलाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत एक लाखाहूनही कमी, पाहा फिचर्स

या गाडीचे एस वन आणि एस वन प्रो असे दोन प्रकार असून दोन्ही समान पद्धतीच्या ऑप्रेटींग सिस्टीमवर काम करतात.

Ola S1 Scooter: केवळ ४९९ रुपयांमध्ये बूक करा ओलाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत एक लाखाहूनही कमी, पाहा फिचर्स
कंपनीने आणल्या अनेक विशेष ऑफर्स

ओला इलेक्ट्रिकने आपली ओला एस वन ही स्कूटर रिलॉन्च केली आहे. कंपनीने ग्राहकांना एस वनच्या बेस मॉडेलची डिलेव्हरी देण्यास सुरुवात केल्याचंही म्हटलं आहे. विशेष म्हणजे या गाडीची किंमत एक लाखांहून कमी आहे. या गाडीचे एस वन आणि एस वन प्रो असे दोन प्रकार असून दोन्ही समान पद्धतीच्या ऑप्रेटींग सिस्टीमवर काम करणाऱ्या आहेत. या गाड्या कंपनीच्या फ्लॅगशीप गाड्यांसारख्याच आहेत.

नक्की वाचा >> Tata Punch: एक लाख भरा आणि टाटा पंचचे मालक व्हा; जाणून घ्या या Mini SUV चे फिचर्स, किती मासिक EMI भरावा लागेल पाहा

एसवनमध्ये तीन किलोव्हॅटची बॅटरी असेल. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १३१ किलोमीटरपर्यंतचं अंतर ही गाडी कापू शकते. या गाडीचा सर्वाधिक वेग हा ९५ किमी प्रति तास इतका आहे. एस वन प्रोमध्ये आधीपासून असणारे काही फिचर्स आता एस वनमध्येही देण्यात आले आहेत. यामध्ये म्यूझिक, नेव्हिगेशन आणि रिव्हर्स मोडसारखे फिचर्स आता उपलब्ध करुन देण्यात आलेत.

ओका एस वन स्कूटर ही लाल, जेट ब्लॅक, पोर्सिलेन व्हाइट, नियो मिंट आणि लिक्विड सिल्व्हर या रंगांमध्ये उपलब्द आहे. १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान या स्कूटरवर विशेष ऑफर असून केवळ ४९९ रुपयांमध्ये ही स्कूटर बूक करता येणार आहे. स्कूटर बुकींग केल्यानंतर कंपनीकडून ग्राहकांना समोरुन संपर्क साधला जाईल आणि त्यांच्या सोयीनुसार गाडीची डिलेव्हरी आणि उर्वरित रक्कमसंदर्भातील माहिती दिली जाईल.

नक्की पाहा >> लांब प्रवासात शौचालयाची अडचण? ‘या’ युट्युबरने गाडीतच केलेला जुगाड पाहून म्हणाल वाह्ह!

ओला इलेक्ट्रिकने या गाडीसोबत नव्या वॉरंटीसंदर्भातील धोरणांचीही घोषणा केली आहे. काही ठराविक रक्कम भरुन ग्राहकांना पाच वर्षांपर्यंतच्या अतिरिक्त वॉरंटीचा लाभ घेता येणार आहे. वॉरंटीमध्ये बॅटरी, मोटर, इलेक्ट्रिकल सुटे भाग आणि इतर गाडीच्या भाग पडताळणीनंतर बदलून दिले जातील. देशातील टॉप ५० शहरांमध्ये कंपनी १०० हून अधिक हायपरचार्जर पॉइंट काढणार असून हायपरचार्जींग स्टेशनर्सची संख्या वाढवण्याची घोषणाही कंपनीने केली आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे या गाडीची किंमत खरोखरच एक लाखांपेक्षा अवघ्या एका रुपयाने कमी आहे. या गाडीचं बेस मॉडेल ९९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. एस वन प्रोच्या फ्रिडम एडिशनची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लांब प्रवासात शौचालयाची अडचण? ‘या’ युट्युबरने गाडीतच केलेला जुगाड पाहून म्हणाल वाह्ह!
फोटो गॅलरी