आपल्याला रोजच्या वापरात जसे स्मार्टफोनची गरज असते तशीच एका बाईकची , स्कुटरची किंवा फोर वहिलरची गरज असते. ऑफिसला जाण्यासाठी इतर ठिकाणी जाण्यासाठी लोकं बाईक्स , फोर व्हिलर यांचा वापर करतात. मात्र सध्या बाजारातील गर्दीचे प्रमाण पाहिले तर, टू व्हिलर सोपी पडते. बाजारात प्रवासी बाईक्सची खूप मॉडेल्स उपलब्ध आहेत. शक्तिशाली इंजिन तसेच त्याचे डिझाईन त्याची किंमत यासाठी सध्या लोकांमध्ये प्रसिद्ध असणारी बाईक म्हणजे Honda कंपनीची Honda Shine ही बाईक. बाईकबद्दल अधिक जाणून घेऊयात.

जर तुम्ही होंडा शाईन खरेदी करत असाल तर त्याची किंमत ७८,६८७ ते ८४,१८७ रुपये आहे. मात्र तुमचे एवढे बजेट नसल्यास या बाईकच्या सेकंड हँड मॉडेलवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती आपण जाणून घेऊयात , ज्यामध्ये तुम्हा ही बाईक अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करता येईल. Honda Shine वरील या ऑफर्स वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवरून घेतल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आजच्या सर्वोत्तम आणि स्वस्त ऑफर्सची संपूर्ण माहिती मिळू शकेल.

हेही वाचा : Harley Davidson ने १२० व्या वर्धापनदिनानिमित्त लाँच केल्या ६ लिमिटेड एडिशन्स बाईक्स, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

सेकंड हँड Honda Shine

होंडा शाईनवर सर्वात स्वस्त ऑफर ही OLX वेबसाइटवर सुरु आहे. जिथे दिल्लीची नंबरप्लेट असलेले २०२१ चे मॉडेल आहे. या बाईकची किंमत २० हजार रुपये असून , यावर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा सूट मिळणार नाही.

Used Honda Shine

सेकंड हॅन्ड होंडा शाईनवर आणखी एक स्वस्त अशी ऑफर DROOM या वेबसाईटवर सुरु आहे. जिथे २०१४ चे मॉडेल विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, याची किंमत २७,५०० रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकवर फायनान्स प्लॅनदेखील उपलब्ध असणार आहेत.

Honda Shine सेकंड हॅन्ड मॉडेलवरील ऑफर आजच्या दिवशी संपणार आहे. ही ऑफर BIKES4SALE वेबसाईटवर उपलब्ध आहे. हे २०१५ चे मॉडेल या साईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. याची किंमत ३१,७०० रुपये असून, यावर काही फायनान्स प्लॅनदेखील उपलब्ध आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्वाची सूचना: येथे सांगण्यात आलेल्या सेकंड हँड होंडा शाईनच्या मॉडेल्सचे तपशील जाणून घेतल्यानंतर , तुम्ही तुमच्या बजेटव आवडीनुसार कोणतेही मॉडेल खरेदी करू शकता. मात्र ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी , तुम्ही बाईकची स्थिती तपासली पाहिजे जेणेकरुन डील झाल्यानंतर तुम्हाला नुकसान सहन करावे लागणार नाही.