Priya Marathe Car Collection: घराघरांत लोकप्रिय झालेली ‘पवित्र रिश्ता‘फेम अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री शोकाकूल आहे, पण तिच्या आयुष्यातली एक खास आवड आज पुन्हा चर्चेत आली आहे. साध्या स्वभावाची ही अभिनेत्री मात्र गाड्यांच्या बाबतीत खूपच स्टायलिश आणि हटके आवड बाळगत होती. अभिनयाच्या व्यस्त करिअरसोबत ती नेहमी एका दमदार गाडीमध्ये फिरताना दिसायची आणि गंमत म्हणजे, ती गाडी केवळ एक वाहन नव्हतं… तर तिच्यासाठी तो एक स्वप्नांचा साथीदार होता.
कला, मेहनत आणि साधेपणातून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या प्रियाच्या या आवडत्या गाडीचे फीचर्स इतके शानदार आहेत की, वाचून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. इंडस्ट्रीतील अनेक सहकाऱ्यांनाही ही SUV तिच्या स्टाइलची ओळख वाटायची. काय आहे या गाडीतलं वेगळेपण? नेमकी किती आहे किंमत? आणि का होती ही गाडी प्रियाच्या हृदयाजवळ? चला तर मग, जाणून घेऊया प्रियाची फेव्हरेट गाडी, जी तिच्या आयुष्याच्या प्रवासासारखीच दमदार आणि प्रभावी आहे…
बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींमध्ये एक गोष्ट नेहमी कॉमन असते – लक्झरी गाड्यांबद्दलचं वेड! ‘पवित्र रिश्ता‘फेम अभिनेत्री प्रिया मराठेचीही आवड अशीच हटके होती. साध्या, प्रसन्न स्वभावाची ही अभिनेत्री गाड्यांच्या बाबतीत मात्र एकदम रॉयल चॉईस ठेवायची. तिच्या कलेक्शनमध्ये चमकणारी गाडी म्हणजे टोयोटा फॉर्च्यूनर असल्याची माहिती आहे. ही SUV फक्त गाडी नाही, तर पॉवर, स्टाईल आणि क्लासचा परफेक्ट संगम आहे.
टोयोटा कंपनीने २००९ साली भारतीय बाजारात फॉर्च्यूनर सादर केली होती. तेव्हा तिची किंमत होती तब्बल १८.४५ लाख रुपये, जी त्या काळी गगनाला भिडलेली मानली जायची. तरीदेखील, या SUV ने पहिल्या दिवसापासून लोकांच्या हृदयात आणि रस्त्यांवर राज्य केलं. स्पर्धक कार्स एक एक करून मागे पडल्या, पण फॉर्च्यूनर अजूनही बाजारात ‘बॉस‘म्हणून मिरवतेय.
इंजिन आणि परफॉर्मन्स
२.७-लिटर पेट्रोल इंजिन – १६६ PS पॉवर, २४५ Nm टॉर्क
२.८-लिटर टर्बो डिझेल इंजिन – २०४ PS पॉवर, ५०० Nm टॉर्क
५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय
परफॉर्मन्स इतका स्मूद की एकदा ड्राइव्ह केलं की परत उतरायची इच्छा होत नाही!
फीचर्स जे बनवतात खास
इन्फोटेनमेंट सिस्टीम – स्टँडर्डमध्ये ८-इंच, लेजेंडरमध्ये ८-इंच, Apple CarPlay आणि Android Auto सपोर्टसह
व्हील्स – १८-इंच अलॉय (स्टँडर्ड) आणि २०-इंच (लेजेंडर)
हाय-टेक फीचर्स – ३६०°पार्किंग कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, किक-टू-ओपन टेलगेट, अॅम्बियंट लायटिंग.