देशातील बाजारपेठेत कमी किमतीत अनेक कार्स उपलब्ध आहेत. पण जर तुमचं कुटुंब मोठं आहे आणि तुम्हाला मोठी गाडी हवी असेल तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. पण आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी सात सीटर कार हवी असेल तर तुम्हाला तुमचा खिसा जास्त रिकामा करावा लागणार नाही. दिवाळीच्या आधीच तुम्हाला स्वस्तात भारतातील लोकप्रिय ७ सीटर MPV कार घरी नेता येणार आहे.

सात सीटर कारचे फीचर्स

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत, ती कार भारतातील सर्वात स्वस्त ७ सीटर कारपैकी एक आहे. ही कार RXE, RXL, RXT आणि RXZ या चार ट्रिम स्तरांवर एकूण आठ व्हेरिएंटमध्ये विकली जाते. ही एमपीव्ही लूक आणि फिचर्समध्ये देखील चांगली आहे. ही MPV मध्ये ९९९ cc १.०-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन १०० PS पर्यंत पॉवर आणि १६० Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या कारचे मायलेज २० किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

(हे ही वाचा : ‘या’ दोन टू व्हीलर कंपन्यांचा बाजारात धुमाकूळ; ३० दिवसात विकल्या ‘इतक्या’ बाईक्स, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा )

या कारची किंमत ६.३३ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ८.९७ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, चार एअरबॅग, एबीएस विथ ईबीडी, रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर-व्ह्यू कॅमेराही उपलब्ध आहेत. ही कार ४-स्टार NCAP रेटिंगसह येते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘या’ कारला स्वस्तात खरेदी करा

Renault Triber या कारवर कंपनी सूट देत आहे. तुम्हाला ही कार सात लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येऊ शकते. या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात २०.३२ सेमी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंट केलेले ऑडिओ आणि फोन नियंत्रणे, एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्ट ऍक्सेस कार्ड, पुश स्टार्ट-स्टॉप बटण, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, ६-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, सेंट्रल कूल्ड उपलब्ध आहे.