लोक बऱ्याच काळापासून रॉयल एनफील्डच्या नवीन हिमालयन बाईकची आतुरतेने वाट पाहत आहेत. रॉयल एनफिल्डच्या बाईकची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन २०२४ चे जागतिक पदार्पण ७ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार असल्याची माहिती कंपनीकडून आली आहे. लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डच्या बाईक्सना जगभरातून पसंती मिळतेय. आता या नव्या बाईकची माहिती उघड झाली आहे. RE ने अजून अधिकृत स्पेसिफिकेशन्स उघड केलेले नाहीत पण तिचे लुक, फीचर्सबद्दल माहिती मिळालेली आहे.

मोटारसायकलला समोर आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेक असतील आणि ड्युअल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) देखील असेल. यातून उत्तम ब्रेकिंगची अपेक्षा करता येईल. हे नवीन K1 डबल-क्रॅडल प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यात समोर USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट असेल. हा सस्पेन्शन सेटअप अधिक चांगला असण्याची अपेक्षा आहे.

(हे ही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळतेय ‘ही’ देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर MPV कार; मायलेज पाहाच… )

मोटरसायकलमध्ये राईड-बाय-वायर तंत्रज्ञान, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि सर्व-एलईडी प्रकाश व्यवस्था असेल. मोटरसायकलमध्ये १५१०mm लांब व्हीलबेस आहे, जो हिमालयन 411 पेक्षा सुमारे ४५mm लांब आहे. या साहसी मोटारसायकलचे कर्ब वेट १९६kgs आहे.

त्याची इंधन टाकी पहिल्या मॉडेलपेक्षा थोडी मोठी दिसते. यात २१-इंच पुढची आणि १७-इंच मागील चाके असतील. त्यात ट्यूबलेस टायर मिळणार आहेत. बाईकमध्ये गोल आकाराचा एलईडी हेडलाइट, मोठी इंधन टाकी, मोठी विंडस्क्रीन, स्प्लिट सीटिंग आणि कॉम्पॅक्ट टेल-सेक्शन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात नवीन ४५१.६६cc लिक्विड-कूल्ड, ४-व्हॉल्व्ह इंजिन असेल. हे इंजिन सुमारे ३९.५७bhp आणि सुमारे ४०-४५ Nm जनरेट करेल अशी अपेक्षा आहे. ही नवीन मोटारसायकल बाजारपेठेत KTM Adventure 390 आणि BMW G310 GS शी स्पर्धा करेल, अशी माहिती आहे.