रॉयल एनफिल्ड कंपनी २०२२ मध्ये नवीन अॅडव्हेंचर बाइक लॉंच करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. त्यातच कंपनीने या वर्षी प्रथम Scram ४११ लाँच करण्याची घोषणा केली आहे. रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) ७ मार्च रोजी भारतात एक नवीन मोटरसायकल लाँच करणार आहे. भारतीय ग्राहक बर्‍याच दिवसांपासून या मोटरसायकलची वाट पाहत आहेत आणि ती रस्त्यावर तसेच ऑफ-रोडिंगवर चालवता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे.

लाल आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये दिसली

अलीकडे ही नवीन मोटरसायकल दोन रंगांमध्ये म्हणजे लाल आणि काळ्या रंगाच्या चमकदार कॉम्बिनेशनमध्ये पाहाण्यात आली आहे. जरी scrum ४११ ही बाइक पूर्वी अनेकदा पाहिली गेली असली तरी, ड्युअल टोनमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाईकच्या पुढील बाजूस १९-इंच चाक आणि मागील बाजूस १७-इंच चाक आहे. या बाईकची किंमत अतिशय आकर्षक ठेवली जाणार आहे, जी बहुतेक ग्राहकांच्या श्रेणीत पडू शकेल, अंदाजे किंमत सुमारे १.९० लाख रुपये असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन Scrum ४११ रॉयल एनफिल्ड हिमालयनच्या मॉडेल पेक्षा स्वस्त असेल. हिमालयाच्या पुढील भागाला एक लांब विंडस्क्रीन, दुभाजक सीट, लगेज रॅक, मोठे फ्रंट व्हील आणि साहसी बाईकचे इतर अनेक भाग मिळतात. याउलट, Scrum ४११ ला छोटी चाके, सिंगल पीस सीट, लहान सस्पेन्शन ट्रॅव्हल आणि मागील बाजूस ग्रॅब रेल देण्यात आली आहे. ही नवीन मोटरसायकलला LS410, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, SOHC इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे जे ४११ cc आणि २४.३ bhp बनवते.