सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाकडे चार चाकी असते. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण चार चाकी गाडी खरेदी करावी. त्यानुसार आपण आपल्या बजेटनुसार चार चाकी गाड्या खरेदी करत असतो. सध्या बाजारात कार उत्पादक कंपन्यांची अनेक मॉडेल्स लॉन्च होत आहेत. यापुढेही होत राहणार आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक, पेट्रोल -डिझेल, सीएनजी असे व्हेरिएंट आपल्याला बघायला मिळतात. आजकाल, जवळजवळ सर्व कार कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये सनरूफ फीचर देत आहेत. हे सनरूफच्या फीचरला सध्या देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
एका बाजूने या सनरूफ फीचर्सचा विचार केला असता हे फिचर थंड हवामानामध्ये, स्पोर्टी मोडमध्ये एक वेगळाच अनुभव तुम्हाला देते. मात्र याचे काही फायदे आहेत तसे याचे काही तोटे देखील आहेत. या फीचरमुळे काय तोटे होऊ शकतात किंवा होतात ते जाणून घेउयात.
१.
सनरूफ फिचर असलेली कार खरेदी करण्याचा पहिला तोटा म्हणजे सनरूफ नसलेल्या कारपेक्षा ती आधी महाग असते. म्हणजेच सनरूफ खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.
२.
सनरूफ हे स्पोर्टी फिचर असल्यामुळे त्या कारचे वजन सामान्य कारपेक्षा जास्त असते. त्यामुळे याचे वजन जास्त असल्यामुळे याचा फरक या कारच्या मायलेजवर पडतो. म्हणजेच या कार्सला मायलेज कमी मिळते. सनरूफ हे फिचर असलेल्या कारमध्ये हेडरूम म्हणजेच आपण गाडीत बसतो तिथे डोके आणि गाडीचे छत यामधील अंतर खूपच कमी होते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची उंची जास्त असल्यास त्याला अशा कारमध्ये बसण्यास त्रास होतो.
३.
सनरूफ असलेल्या कार्समध्ये पावसाळ्यात लिकेज होण्याची शक्यता असते. जर का चुकून ते पावसाळा किंवा वादळ असलेल्या वातारणात जर का सनरूफ उघडे असेल तर तुमच्या गाडीमध्ये पाणी शिरू शकते. म्हणजेच तुमचे नुकसान होऊ शकते. कारमध्ये असलेल्या सनरूफचा कारच्या ब्रेकिंग सिस्टमवरही परिणाम होत असतो. त्यामुळे एखाद्या प्रकारची घटना घडण्याची शक्यता असते.
४.
सनरूफ कारमध्ये प्रवास करणे जेवढे छान आहे, त्यात काही गडबड झाली तर त्याच्यासाठी करावा लागणार खर्च हा जास्त प्रमाणात होतो. कारमध्ये दिलेल्या सनरूफमध्ये काचेचा वापर केला जातो. ज्यामध्ये काळजी न घेतल्यास काहीतरी त्याचे उकसान होऊ शकते. कधीतरी जाणूनबाजून कोणीतरी त्याचे नुकसान करू शकते. असे झाल्यास नवीन सनरूफ बसवण्यासाठी खूप खर्च येऊ शकतो.