गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये स्कूटरबाबतची क्रेझ वाढली आहे. स्कूटरमध्ये १०० सीसी ते १६० सीसी स्कूटर उपलब्ध आहेत. तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून स्कूटर तयार करण्यात येत आहेत. मात्र इतके सारे पर्याय असताना नेमकी कोणती स्कूटर घ्यायची?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी आम्ही आज तुम्हाला दोन स्कूटरची माहिती देणार आहोत. यात सुझुकी अ‍ॅक्सेस 125 आणि हिरो मॅस्ट्रो एज 125 या दोन स्कूटर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात स्कूटरची वैशिष्ट्य आणि किंमती.

Suzuki Access 125: सुझुकी अ‍ॅक्सेस 125 ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. अलीकडेच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अपडेट करण्यात आली आहे. कंपनीने त्याचे सहा व्हेरियंट बाजारात आणले आहेत. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.७ पीएस पॉवर आणि १० एनएम पीक टॉर्क जनरेट करत असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडले जाते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढील चाकावर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस अ‍ॅलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्ससह ड्रम ब्रेक यांचा समावेश आहे. मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ५७.२२ किमीचा मायलेज देत असून मायलेज ARAI द्वारे प्रमाणित केले आहे. सुझुकी अ‍ॅक्सेस 125 ची सुरुवातीची किंमत ७५,६०० रुपये असून टॉप व्हेरिएंटवर ८४,८०० रुपयांपर्यंत जाते.

Bajaj Pulsar 180 vs TVS Apache RTR 180: किंमत आणि फिचर्स वाचून ठरवा कोणती बाइक खरेदी करायची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Hero Maestro Edge 125: हिरो मॅस्ट्रो एज 125 ही आकर्षक डिझाइन केलेली स्कूटर आहे जी कंपनीने चार प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. या स्कूटरला सिंगल सिलेंडर १२४.६ सीसी इंजिन देण्यात आले आहे जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ९.१ पीएस पॉवर आणि १०.४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडले जाते. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक, तर मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक अ‍ॅलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्ससह स्थापित केले आहेत. स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही हिरो मॅस्ट्रो एज 125 ही गाडी ६५ किमीचा मायलेज देते. मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. हिरो मॅस्ट्रो एज 125 ची सुरुवातीची किंमत ७३,४५० रुपये असून टॉप व्हेरियंटवर ८८,९२० रुपयांपर्यंत जाते.