Scooter Care: पेट्रोलच्या किमतीत कितीही वाढ झाली तरीही दिवसेंदिवस बाईक किंवा स्कुटी चालविणाऱ्या चालकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात दुचाकींचा वापर केला जातो. बाईकच्या तुलनेत स्कुटींचाही वापर अनेक जण करतात. त्यामुळे स्कुटीची योग्य रीतीने कशी काळजी घ्यावी याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

स्कुटीचे जास्त अ‍ॅव्हरेज मिळवण्यासाठी काय करावे?

स्कुटी ओव्हरलोड करू नका

अनेक जण त्यांच्या स्कूटरचा वापर कारप्रमाणे करतात. एकाच स्कुटीवर क्षमतेपेक्षा जास्त सामान किंवा लोकांना घेऊन जातात आणि त्यामुळे स्कूटरचे अॅव्हरेज कमी होते. स्कुटीवरून क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन गेल्यास अपघात होण्याचीही शक्यता असते.

फिल्टर स्वच्छ ठेवा

दर ५०० ते १००० किलोमीटरनंतर एअर फिल्टर साफ करण्याचा प्रयत्न करा. प्रदूषणामुळे एअर फिल्टर लवकर खराब होते. जर ते नियमितपणे साफ केले गेले, तर इंजिनाची कार्यक्षमता तसेच अॅव्हरेज वाढेल.

हेही वाचा: घरच्या घरी बाईकची सर्व्हिसिंग करायची आहे? ‘या’ सोप्या टिप्स वाचवतील तुमचे पैसे

स्पार्क प्लगकडे दुर्लक्ष करु नका

स्कूटरच्या इंजिनाला योग्य प्रमाणात विद्युत प्रवाह देण्यासाठी स्पार्क प्लगचा वापर केला जातो. त्यामुळे स्पार्क प्लग साफ करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. जर ते स्वच्छ नसेल, तर इंजिनपर्यंत विद्युत प्रवाह पोहोचण्यात अडचण येते आणि त्याचा परिणाम अॅव्हरेजवर होतो.

वेग मर्यादित ठेवा

चांगले अॅव्हरेज मिळविण्यासाठी स्कूटर नेहमी निर्धारित वेगाने चालविली पाहिजे. त्यामुळे स्कूटरचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतकाच ठेवावा. जेव्हा स्कूटर या वेगाने चालवली जाते, तेव्हा इंजिन चांगल्या रीतीने कार्य करते आणि इंधनाचा वापरदेखील कमी होतो. त्यामुळे सरासरी वाढते.

हेही वाचा: चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे पडेल महागात; ‘या’ टिप्स वाचून वेळीच व्हा सावध!

स्कुटीची वेळोवेळी काळजी घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा लोक त्यांच्या स्कूटरकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे त्याचा इंजिनावर विपरीत परिणाम होतो. इंजिनावर असा दुष्परिणाम झाल्यामुळे स्कूटरमध्ये इंधनाचा वापरही वाढतो.