2023 Tata Harrier, Safari Facelift Launch: टाटा मोटर्सने त्यांच्या दोन नवीन SUV सफारी आणि हॅरियर फेसलिफ्ट सादर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या दोन्ही एसयूव्ही सुरक्षेच्या बाबतीत खूप पुढे आहेत. वास्तविक, त्यांच्या लॉन्चसह, ग्लोबल NCAP चे सुरक्षा रेटिंग देखील उघड झाले आहे आणि दोघांनाही फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. या दोन्ही कार देशातील सर्वात सुरक्षित कार ठरल्या आहेत.

GNCAP ने क्रॅश चाचणीच्या आधारे या दोन्हीं कार्सना फाईव्ह स्टार रेटिंग दिले आहे. नवीन सफारी आणि हॅरियरला प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३४ पैकी ३३.०५ गुण आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी ४९ पैकी ४५ गुण मिळाले. इतर कारपैकी या भारतीय कारनं मिळवलेले हे सर्वाधिक गुण आहेत. यामुळे या दोन्ही कार भारतीय रस्त्यावर धावणाऱ्या सर्वात सुरक्षित कार ठरतात.

(हे ही वाचा : बाकी कंपन्याचं वाढलयं टेन्शन, होंडाची २८६ सीसीची पाॅवरफुल बाईक नव्या अवतारात देशात दाखल, बुकिंग सुरू, किंमत…)

नवीन टाटा सफारी आणि हॅरियरचे इंजिन

या दोन्हीमध्ये समान २.०L, ४-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन असेल, जे १७०PS पॉवर आणि ३५०Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, दोन्हीच्या मायलेजमध्ये थोडा फरक आहे.

नवीन टाटा सफारी आणि हॅरियरचे मायलेज

नवीन Tata Safari फेसलिफ्ट मॅन्युअल गिअरबॉक्ससह १६.३० kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह १४.५० kmpl चे मायलेज देऊ शकते तर नवीन Harrier मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह अनुक्रमे १६.०८kmpl आणि १४.६०kmpl मायलेज देऊ शकते.

नवीन टाटा सफारी आणि हॅरियर किंमत

नवीन सफारी फेसलिफ्टची किंमत १६.१९ लाख रुपयांपासून सुरू होते तर नवीन हॅरियर फेसलिफ्टची किंमत १५.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने दोन्ही कारचे बुकिंगही सुरू केले आहे. २५ हजार रुपये टोकन रक्कम भरून खरेदीदार अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिपवरून या दोन्ही कार बुकींग करू शकतात.