जर तुम्ही या नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, नवीन कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागेल. नवीन वर्ष सुरु होताच देशातील वाहन उत्पादक कंपन्या आपल्या कारच्या किमतीत वाढ करुन ग्राहकांना दणका देत आहेत. नुकतीत देशातील दिग्गज आॅटो कंपनी मारुती सुझुकीने आपल्या सर्व कारच्या किमतीत वाढ करुन ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. त्यातच आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनीने आपल्या कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

मारुतीनंतर आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे. कंपनीने याची अधिकृत घोषणाही केली आहे. टाटाने याआधीही आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. आता कंपनी पुन्हा किमतीत वाढ करणार आहे, ज्यामुळे टाटाची कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहे.

देशांतर्गत वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने रविवारी आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांसह (EVs) प्रवासी वाहनांच्या किमती ०.७ टक्क्यांनी वाढवणार आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे किमती वाढवल्या जात आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या वाहनांच्या वाढलेल्या किमती १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू होतील.

(हे ही वाचा : Tata Nexon चे धाबे दणाणले, २५ हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेली कार नव्या अवतारात आलीये देशात, किंमत…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा मोटर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही वाढ १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू होईल. इनपुट खर्चातील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी वाहनांच्या किमती वाढवल्या जात आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, कार निर्मात्याने म्हटले होते की, आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण जागतिक घाऊक विक्री वार्षिक ९ टक्क्यांनी वाढून ३,३८,१७७ युनिट्सवर पोहोचली आहे. प्रवासी वाहन विभागामध्ये, टाटा मोटर्सची जागतिक घाऊक विक्री १,३८,४५५ युनिट्सवर आहे, जी याच कालावधीत वार्षिक तुलनेत ५ टक्क्यांनी वाढली आहे.

दरम्यान, आपल्या कारच्या किमती वाढवणारी टाटा मोटर्स ही एकमेव ऑटोमेकर नाही. मारुती सुझुकी इंडियाने १६ जानेवारी रोजी भारतात आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली. एकूणच महागाई आणि वस्तूंच्या वाढलेल्या किमतीमुळे खर्चात झालेली वाढ यामुळे कंपनीने वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.